Abdul Sattar On Sanjay Raut | बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार; म्हणाले – ‘आम्ही गुलाम नाही, कोणाचे नोकर नाहीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Abdul Sattar On Sanjay Raut | शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोर गटाविरोधात काल-परवापर्यंत संयमाची भूमीका घेणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे नेते आता अचानक आक्रमक भूमिकेत शिरले आहेत. राज्यभरात शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज बंडखोर आमदारांवर घणाघात केला आहे. यावर आता बंडखोर आमदारही प्रत्युत्तर देऊ लागले आहे. खासदार राऊत यांच्या वक्तव्यावर बंडखोर राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

बंडखोर शिंदे गटाने त्यांच्या गटाला ’शिवसेना बाळासाहेब’ असे नाव दिल्याने शिवसेनेत संतप्त पडसाद उमटत आहेत. शिवसेना नेत्यांनी यावरून शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. यानंतर शिंदे गटाच्यावतीने काल मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

 

दरम्यान, संजय राऊत यांनी बंडखोराविरोधात केलेल्या वक्तव्यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटले होते की, अब्दुल सत्तार यांना कसले आलेय हिंदुत्त्व. यावर सत्तार यांनी म्हटले की, आम्ही कोणाचे गुलाम नाही. (Abdul Sattar On Sanjay Raut)

अब्दुल सत्तार यांनी म्हटले की, संजय राऊत म्हणतात, अब्दुल सत्तारांना कशाचे आलेय हिंदुत्त्व.
मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. हिंदुत्त्वाचा भगवा हाती घेतला. पण, ते बोलत आहेत टिव्हीवर.
आम्ही काही कोणाचे गुलाम नाही, आम्ही कोणाचे नोकर नाही, आम्हालाही स्वाभिमान आहे.

 

सत्तार पुढे म्हणाले की, मी 42 वर्षांचा राजकारणी आहे. मात्र, ज्या पद्धतीने ते आम्हाला बोलतात, ती पद्धत योग्य नाही.
आम्हालाही स्वाभिमान आहे. 50 आमदार जे इथे बसलेत त्यांची भावना बोलत आहे.
यांच्या बोलण्याने शरीराला, मनाला वेदना होतात. ग्रामपंचायत सदस्यांनासुद्धा एकत्र बांधण्यासाठी प्रयत्न केले जातात.
आम्ही तर आमदार आहोत, मी राज्यमंत्री आहे. पण, आमच्याबद्दल हे बोलणे बरोबर वाटत नाही.
यावेळी सत्तार यांनी, राज्यात नवीन सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला.

 

Web Title :- Abdul Sattar On Sanjay Raut | shivsena we are not slaves we are not servants of anyone abdul sattar retaliates against sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा