महाविकास आघाडीला ‘सुरुंग’ ! अब्दुल सत्तारांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा, आमदारकी सोडणार का ?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचा खातेवाटपाचा गोंधळ सध्या सुरु असताना महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती मात्र शिवसेनेला धक्का देत सत्तार यांनी आपल्या राज्य मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे समजते.
महाविकास आघाडीचे सरकार तर राज्यात स्थापन झाले आहे मात्र खातेवाटपाचे गुऱ्हाळ अजून सुरूच आहे. तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या सरकारमध्ये निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे शिवसेनेला खूपच जड जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच कोणताही निर्णय घेताना महाविकासआघाडीला वेळ लागत आहे.
या कारणामुळे दिला सत्तार यांनी मंत्री पदाचा राजीनामा
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे सहा आमदार आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये देखील सेनेची मोठी ताकद आहे मग अशात शिवसेनेने जिल्हा परिषदेत काँग्रेसला साथ का द्यावी या कारणावरून सत्तार यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. तसेच सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र राज्यमंत्रीपद मिळाल्याने ते काहीसे नाराज देखील होते. जिल्हा परिषदेच्या निर्णयांमध्ये स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता निर्णय करण्यात आल्यामुळे सत्तार यांनी आपल्या राज्य मंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे समजते.
सत्तार यांच्या राजीनामा हा महाविकास आघाडीसोबतच शिवसेनेला देखील मोठा धक्का मानला जात आहे. राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्तार हे आता आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- मेहनत करूनही ‘सिक्स पॅक अॅब्स’ होत नाहीत ? मग ‘या’ 5 टिप्स जाणून घ्या
- मच्छरांबद्दलच्या ‘या’ 6 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ? जाणून घ्या
- आठवड्यातील ‘हा’ वार आहे सर्वात ‘डिप्रेसिंग’, जाणून घ्या 4 कारणे
- ‘किडनी स्टोन’ असताना ‘या’ 8 पदार्थांचे सेवन पडू शकते महागात !
- ‘या’ 5 गोष्टी आहेत डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर
- तासनतास बसून काम केल्याने होतात ‘या’ 4 समस्या, जाणून घ्या
- जिभेच्या 5 प्रकारावरून ओळखा तुम्हाला कोणता आजार झालाय