Abdul Sattar | दारु पिता का? या वादग्रस्त व्हिडिओवर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण – म्हणाले…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सध्या राज्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका ठिकाणी चहा पाणी घेताना, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का? असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे हा त्यांचा शासकीय पाहणी दौरा आहे की, अन्य कोणता, असा प्रश्न विचारला जात होता. काँग्रेस नेते (Congress Leader) सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ ट्वीट केला होता. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर या व्हिडिओमुळे टीका देखील झाली आहे. अखेर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

समाज माध्यमांवर सध्या प्रसारीत आणि प्रचंड चर्चा झालेला व्हिडिओ 15 दिवसांपूर्वीच्या बीड दौऱ्याचा आहे. त्यावेळी चहासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) विचारले होते. त्यांनी चहा नको म्हटले होते. त्यावर मी त्यांना दुसरे काय घेता मग? असे विचारले होते. दारु घेता का? (Abdul Sattar) असे साधे संभाषण होते. पण, आता लोकांना काही कामच राहिले नाही. राधा विनोद शर्मा बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्यासोबत चहाच्या गप्पा मी मारत होतो. तुम्ही जर माझ्याकडे आलात, आणि मी तुम्हाला म्हटले, चहा घ्या. तुम्ही चहा घेत नाही, तर मग काय दुसरे काही घेता का? असे विचारले, तर तो अपराध आहे का? हे बोलणे पाप असेल, तर मग त्याला माझा नाईलाज आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

या प्रसारीत झालेल्या व्हिडिओत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि त्यांचा ताफा तसेच जिल्हाधिकारी राधा
विनोद शर्मा आदी लोक एका ठिकाणी चहा घेत आहेत.
यावेळी कृषीमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारले दारु घेता का? त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे उत्तर दिले
आहे की, हो. कधी कधी घेतो.
जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा (Radha Vinod Sharma) आणि कृषी मंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या समाज
माध्यमांवर प्रचंड प्रसारीत झाला होता.

Web Title :- Abdul Sattar | shinde group abdul sattar on viral video about liquor beed collector

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Andheri Bypoll | शिवसेनेचे टेन्शन वाढले! ‘या’ उमेदवाराची अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची आयोगाकडे केली मागणी

CM Eknath Shinde | “जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय”, असा फोन आल्यास सावधान राहण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा