Abdul Sattar | वादग्रस्त वक्तव्यामुळे अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, महिला आयोगाने घेतली दखल; पोलीस महासंचालकांना कारवाईच्या सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अब्दुल सत्तारांचे (Abdul Sattar) कान टोचले. आता राज्य महिला आयोगाने (State Commission for Women) देखील याची दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना (DGP) कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

 

 

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने (Controversial Statement) करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई (Legal Action) करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा अशी आयोगाकडून सुचना देण्यात आली आहे, असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?
औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणून तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आले. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. ‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’ असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

 

Web Title :- Abdul Sattar | state commission for women has taken note abdul sattar objectionable statement on supriya sule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचे टोचले कान, नेत्यांना दिले ‘हे’ आदेश

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये पाऊस पडला ‘या’ प्रकारे जाहीर करण्यात येणार विजेता, आयसीसीचे नवीन नियम

Pune PMC News | पुणे मनपामध्ये करणार आणखी 200 हून अधिक पदांची भरती; आरोग्य आणि अग्निशामक दलामधील भरतीस प्राधान्य