‘अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंसमोर फेकला’, चंद्रकांत खैरेंचा ‘गौप्यस्फोट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंसमोर फेकला असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केला आहे. माध्यामांशी बोलताना खैरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अब्दुल सत्तारांवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं की, मी मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंसमोर फेकला. त्याच्यानंतर अध्यक्षांनाही मी माझा आमदारकीचा राजीनामा पाठवला असं आमच्यासमोर त्यांनी सांगितलं. ते अतिशय उद्धटपणे बोलत होते. मी शिवसेनेचा नेता या नात्यानं समजावला आलो होतो परंतु ते तावातावात बोलू लागले. यावेळी सगळेच नेते होते. अब्दुल सत्तार गद्दार आहे. अशा गद्दारांना पक्षात राहण्याचाही अधिकार नाही. अब्दुल सत्तार आता भाजपमध्ये गेले आहेत तर रहा म्हणावं भाजपमध्येच. मंत्री असतानाही ते 6 लोक घेऊन का गेले. तुमची ताकद असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “अब्दुल सत्तार गद्दार आहेत त्यांच्यामुळेच आज शिवसेनेचा पराभव झाला आहे त्यांना पवित्र मातोश्रीची पायरी चढू देऊ नये. आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तारांच्या गटाचं मतदान झालचं नाही. त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. मी उद्धव ठाकरेंना सांगून सत्तारांवर कारवाई करायला सांगणार आहे. माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. परंतु मी म्हणतो अब्दुल सत्तार गद्दार आहेत.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/