ABG Shipyard Scam | देशातील सर्वात मोठा 22 हजार 842 कोटींचा बँकिंग घोटाळा उघडकीस; एबीजी शिपयार्डने 28 बँकांची केली फसवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ABG Shipyard Scam | उद्योगपती विजय मल्या (Industrialist Vijay Mallya) व हिरे व्यावसायिक नीरव मोदी (Diamond Businessman Nirav Mod) यांनी मोठ्या प्रमाणात बँकांची फसवणूक (Cheating) केली होती. बँकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे हे पहिल्यांदाच घडले होते. मात्र आता या दोघांपेक्षाही गुजरातच्या (Gujarat) कंपनीने तब्बल 22 हजार 842 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तब्बल एबीजी शिपयार्डने (ABG Shipyard Scam ) 28 बँकांची फसवणूक केली असून सीबीआयने (CBI) एबीजी शिपयार्ड आणि कंपनीचे तत्कालीन सीएमडी ऋषी अग्रवाल (CMD Rishi Agarwal) यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हे (FIR) दाखल केले आहेत.

 

सूरत, दहेज येथे एबीजी शिपयार्डची कंपनी (ABG Shipyard Scam) आहे.
या कंपनीविरोधात सर्व प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) तक्रार दाखल केली आहे.
कंपनीने जेवढी रक्कम कर्ज म्हणून घेतली होती त्यातील बहुतांश रक्कम परदेशात पाठवली असून त्यातून मालमत्ता खरेदी (Property Purchase) केली आहे.
इतकच नाही तर नियम धाब्यावर बसवून दुसऱ्या कंपनीला पैसे दिल्याचे समोर आले आहे.
कंपनीने 2012 ते 2017 या काळात फसवणूक केल्याचे फॉरेंसिक ऑडिटमध्ये (Forensic Audit) आढळले.
एबीजी शिपयार्ड व एबीजी इंटरनॅशनल (ABG International) या दोन प्रमुख कंपन्यांसह अन्य कंपन्यांवर आरोप केले आहेत.
8 नोव्हेंबर 2019 मध्ये सीबीआयकडे एसबीआयने (SBI) तक्रार केली होती.
दीड वर्षे तपास केल्यानंतर अग्रवालसह कंपनीचे तत्कालीन कार्यकारी संचालक ससंथानम मुथास्वामींसह (Executive Director Sansthanam Muthuswamy) 8 जण व एबीजी इंटरनॅशनल या कंपनीविरोधात 7 फेब्रुवारी 2022 ला गुन्हे दाखल केले आहेत.

या बँकांना फटका…
एबीजी शिपयार्ड कंपनीने एसबीआयची 2 हजार 468, आयसीआयसीआय बँकेची (ICICI Bank) 7 हजार 89,
आयडीबीआय बँकेची (IDBI Bank) 3 हजार 634, बँक ऑफ बडोदाची (Bank of Baroda) 1 हजार 614,
पंजाब नॅशनल बँकेची (Punjab National Bank) 1 हजार 244 आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची (Indian Overseas Bank) 1 हजार 228 कोटींची फसवणूक केली आहे.

 

Web Title :- ABG Shipyard Scam | ABG Shipyard Scam 28 banks defrauded of rs 22842 crore the biggest scam in the banking sector

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा