अबब..! मुले विकत घेऊन त्यांना चोरीचे ट्रेनिंग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मुलाच्या नातेवाईकाला वर्षाला लाखो रुपयांची रक्कम देऊन मुलाला विकत घ्यायचे व त्याला विकत घेऊन चोऱ्या करून घेण्याचं रॅकेट चालविणारी टोळी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीतील सर्व आरोपी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या गावात प्रत्येक घरातील मुलाला चोरी करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी प्रत्येक मुलावर तब्बल तीन लाख रुपये खर्च केले जात असल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आहे.

शिर्डी येथील लग्नसमारंभातून 55 तोळे सोने चोरीस गेल्याच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मध्यप्रदेशातील टोळीची माहिती मिळाली. सोमवारी रात्री उशिरा सदर टोळी शिर्डी परिसरात येणार असल्याची माहिती त्यांच्या गोपनीय खबऱ्याकडून मिळाली होती. त्या आधारे पोलिस उपनिरीक्षक सचिन खामगळ यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक तिथे गेले. शिर्डी परिसरातून अल्टो कार, बोलेरो जीप, तलवारीसह इतर शस्त्रांसह चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या अशा मुद्देमालासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

अटक केलेल्यांमध्ये दिलीप मानसिंग सिसोदीया (वय- ३० वर्षे), नवन प्रेमनारायण भानेरिया (वय- ३२ वर्षे),  मोहनसिंग गोपालसिंग सिसोदीया (वय२२ वर्षे),  प्रदीप मानसिंग सिसोदीया (वय- २८ वर्षे), अशिषकूमार अनूपसिंग छायन (वय-२० वर्षे),  अभिषेक विनोद सिसोदीया (वय- २० वर्षे,  सर्व रा. कडीया, ता- पचौर, जि- राजगड, राज्य- मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

या टोळीची सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. पकडल्यानंतर चोरीची कबुली दिली जाऊ नये, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात होते. मुलाच्या नातेवाईकाला लाखो रुपयांची रक्कम देऊन वर्षभरासाठी त्यांच्या मुलाला टोळीकडून विकत घेतले जात होते. त्याच्यावर प्रशिक्षणाचा खर्च करून चोरी करण्यास लावले जात होते. या गावातील प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारीशी संबंधित आहे. त्यामुळे गावात पोलीस आल्यास त्यांच्याकडून एकत्रितपणे प्रतिकार केला जातो. संपूर्ण गावच गुन्हेगारीशी संबंधित असून त्यांना चोरी करण्याचे खास प्रशिक्षण दिले जाते. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला सोडविण्याची जबाबदारी ही टोळी प्रमुख उचलत असतो. अशा पद्धतीने सराईत गुन्हेगार करणाऱ्या होळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन कामगार सहाय्यक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोहेक / मनोज गोसावी, पोना / सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, आण्णा पवारविशाल दळवी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, योगेश गोसावी, रविन्द्र कडलेबाळासाहेब मुळीकमोहन गाजरे, फकीर शेख, दत्ता हिंगडे, सुरेश माळी, विजय ठोंबरे, सूरज वाबळे, विजय धनेधर व चालक बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.