‘तुला पाहते रे’ मालिकेतील मायरा दिसणार ‘या’ वेगळ्या भूमिकेत

मुंबई – वृत्तसंस्था – सुबोध भावे आणि गायत्री दातार यांच्या तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी तुला पाहते रे या मालिकेतील मायरा भूमिकेत लोकप्रिय झाली आहे. आगामी येणाऱ्या सुर सपाटा या सिनेमातून तिचीही महत्त्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाणार आहे. हा चित्रपट येत्या 22 मार्चला संपुर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये पेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि प्रस्तुत जयंत लाडे निर्मित आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित आहे.

अभिज्ञा भावे यांनी देवयानी, लगोरी खुलता कळी खुलेना, कट्टी-कट्टी, आणि तुला पाहते रे, अशा मालिकेतून अभिनयाची छाप आपली छाप पाडणारी अभिज्ञा नेहमीच हटक्या भूमिकेत आपल्याला दिसत आलेली आहे पण ‘सूर सपाटा’मधील भूमिका काहीशी वेगळी आहे. स्त्री ही प्रत्येक घराची सपोर्ट सिस्टीम असते. मग ती आजी, आई, बायको, बहीण कुठल्याही स्वरूपात असो. संपूर्ण कुटुंब जिच्या कवेत गुण्यागोविंदानं नांदतं अशी समर्थ भूमिका अभिज्ञाच्या वाट्याला या चित्रपटाच्या निमित्ताने आली आहे. ‘सूर सपाटा’ मध्ये अभिज्ञा एका ध्येयवेड्या कबड्डीपट्टू मुलाच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय पटवर्धनच्या म्हणजेच ‘सूर सपाटा’ मधील ‘पुरण’ च्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेतील अभिज्ञा कधी प्रेमळ… प्रसंगी कठोर… तर कधी भावाच्या पंखांना बळ देणाऱ्या खंबीर भूमिकेत विशेष कष्ट घेताना दिसतेय.

नेहमीप्रमाणेच या सुद्धा भूमिकेला प्रेक्षक नक्कीच पसंतीची पावती देतील अशी अभिज्ञाला आशा आहे. आपल्या मातीतला खेळ ‘कबड्डी’ वर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या चित्रपट क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगलेली असून अनेक दर्जेदार चित्रपटांतून लोकप्रियतेच्या कळसावर आरूढ होणार राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका ‘सूर सपाटा’ मध्ये आपल्याला पहायला मिळतील. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंत या चित्रपटात एकाचवेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ह्या गुलदस्त्यातील काही पत्ते आत्तापर्यंत उलगडण्यात आले असून उपेंद्र लिमये आणि संजय जाधव यांची नावे उघड करण्यात आली आहेत तर आत्ता पुढील नावांमध्ये कुठले कलावंत असणार या प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत.