Abhijeet Bichukale | अभिजित बिचुकलेची ‘बिग बॉस 15’ मध्ये होणार वाइल्ड कार्ड ‘एंट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Abhijeet Bichukale | हिंदी ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) चा टीआरपी (TRP) दिवसेंदिवस घसरत चालला आहे. यामुळे आता या शोला अधिक रंजक बनवण्यासाठी व शोचा टीआरपी उंचवण्यासाठी काही लोकांची वाईल्ड कार्ड एंट्री (Wild Card Entry) होणार आहे. अनेक स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे यामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती ‘बिग बॉस मराठी 2’ चा स्पर्धक अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) याची. सलमानच्या (Salman Khan) पुढे बिचुकले कसा वागणार किंवा त्याचा खेळ कसा असणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

 

अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांच्यासोबत डोनल बिष्ट (Donal Bisht), विधी पांड्या (Vidhi Pandya) व्यतिरिक्त बिग बॉस ओटीटीचा भाग असलेले जिशान खान (Jishan Khan) आणि अक्षरा सिंह (Akshara Singh) देखील ‘बिग बॉस 15′ मध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच बिग बॉस 15’ मध्ये खळबळ माजवणारी गायिका अफसाना खानचीसुद्धा (Afsana Khan) पुन्हा एंट्री होऊ शकते. काही दिवसांपूर्वी बिग बॉसने अफसानाला शिक्षा म्हणून बेघर केले होते. वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये अफसाना खानसुद्धा समावेश असल्याचे समजत आहे.

 

अभिजित बिचुकले कोण आहे?

अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) हा मूळचा सातारा येथील आहे. त्यानं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आजवर अनेक स्टंट केले आहेत.
अभिजीत बिचुकले हे कवीसुद्धा आहेत. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी होणारी निवडणूक लढवली आहे.
तसेच त्याने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale ) यांनाही कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.
अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना अजून एकही निवडणूक जिंकता आलेली नाही.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याने ‘2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं बेधडक वक्तव्य केले होते. या निवडणुकीत त्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता.

 

Web Title :- Abhijeet Bichukale | satara abhijeet bichukale to enter bigg boss 15 as wild card marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा