बिग बॉस मराठी 2 : अभिजीत बिचुलकेलची पत्नी ‘बिग बॉस’च्या घरात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बिग बॉस मराठी सीजन 2 जोरात सुरु आहे. बिग बॉसमध्ये सध्या स्पेशल विक सुरु अल्याचं दिसत आहे. यात स्पर्धकांचे कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्ती स्पर्धकांना भेटायला बिग बॉसच्या घरात येऊ शकतात. याचा एक एपिसोड नुकताच पार पडला. यात सर्वांनी पाहिलं की, नेहाचा पती नचिकेत, शिवानीचे वडिल, हिनाची आई आणि किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी बिग बॉसच्या घरात आले होते. पुढील एपिसोडमध्ये आता अभिजीत बिचुकलेची पत्नी मुलांसह बिग बॉसच्या घरात आल्याचे दिसणार आहे.

लवकरच आता बिचुकले आपल्या आई पत्नी आणि दोन मुलांना भेटू शकणार आहे. खूप दिवस झाले आहेत घरातील सदस्य आपल्या कुटुंबियांना भेटलेले नाहीत. लवकरच त्यांना आपल्या मनातील भावना कुटुंबियांजवळ व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. बिचुकले आणि शिवानी यांच्या खूप घट्ट मैत्री आहे. एक फोटो समोर आला आहे ज्यात दिसत आहे की, बिचुकलेच्या पत्नीने आपल्या चिमुरडीला शिवानीकडे दिलं आहे फोटोत दिसत आहे की, शिवानीला अश्रू अनावर होत आहे. शिवानी बिचुकलेची मैत्री सर्वांनाचा ठाऊक आहे. त्याने तर घरीही सांगून ठेवले आहे की, मुलगी मोठी झाल्यावर शिवानीसारखी झाली पाहिजे.

एक गोष्ट मात्र नक्की या स्पेशल विकमुळे स्पर्धकांच्या जवळ्या व्यक्तींना घरात यायला मिळत आहे. त्यामुळे घरातील वातावरणही आनंदमय झाले आहे. सपर्धकांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

आरोग्यविषयक वृत्त