Abhijeet Sawant – Indian Idol Show | ‘छोटे छोटे कार्यक्रम करून फीसाठी जमवायचो पैसे’ ! अभिजित सावंतने सांगितला ‘इंडियन आयडल’पर्यंतचा त्याचा संपूर्ण प्रवास

पोलीसनामा ऑनलाईन – Abhijeet Sawant – Indian Idol Show | इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. त्यानंतर अभिजीत सावंत हे नाव प्रत्येकाच्या तोंडात ऐकायला मिळायचे. त्यानंतर मोहब्बते लुटाऊंगा या गाण्याने तर त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. यामुळे अभिजीत प्रसिद्धीच्या झोतात आला होता. नुकताच अभिजीतने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिजीतने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी अभिजीत म्हणाला, “मी साधारण एकवीस वर्षांचा असताना माझे पदव्युत्तर शिक्षण चालू होते.
त्याचबरोबर माझे गाणे देखील सुरू होते. त्यावेळी मला संगीत क्षेत्रात करिअर करायचं असे वाटतं होते मात्र योग्य मार्गदर्शन करण्यासाठी असे कोणीच नव्हते.
माझे आई-वडील देखील संगीत क्षेत्रातील नसल्यामुळे मला फार गोष्टींचा सामना करावा लागत असे.
यानंतर हळूहळू मी गणपती, नवरात्र अशा कार्यक्रमांमध्ये गाणी म्हणायला सुरूवात केली.
म्हणजे छोटे छोटे कार्यक्रम सोसायटीमध्ये जाऊन घ्यायचो त्यावेळी फारशी कमाई व्हायची नाही पण त्या पैशातून
मी माझे गाणे शिकण्यासाठी लागणाऱ्या फीची सोय करून घ्यायचो. एक दिवशी मी आणि माझे मित्र मुंबईतील
दादर परिसरात फिरत असताना इंडियन आयडलचे ऑडिशन सुरू होते.
त्यावेळी हा कार्यक्रम नेमका काय होता हे कोणालाही ठाऊक नसल्याने गर्दी कमी होती. टाइमपास म्हणून मी आणि माझे मित्र त्या रांगेत जाऊन उभे राहिलो. माझ्या मित्रांपैकी काही तिथून निघून गेले मात्र मी तिथेच उभा राहिलो आणि ऑडिशन दिली”.
(Abhijeet Sawant – Indian Idol Show)

पुढे बोलताना अभिजीत म्हणाला, “त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमोशन व्हायला सुरुवात झाली आणि हा कार्यक्रम किती
मोठा आहे हे सगळ्यांना समजायला लागले.

अशाप्रकारे छोट्या स्टेजवरून मी इंडियन आयडल सारख्या मोठ्या स्टेजवर पोहोचलो आणि या माध्यमातून मी
जगासमोर आलो हा प्रवास माझ्यासाठी खूपच कठीण होता मात्र तितकाच प्रेरणादायी देखील होता”.

Web Title :- Abhijeet Sawant – Indian Idol Show | abhijeet sawant talk about how he gave the audition and seleted for indian idol show

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील गंग्या गँगच्या म्होरक्यासह 7 जणांवर मोक्का कारवाई, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 108 वी कारवाई

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?