Abhijit Bichukale | पुन्हा एकदा अभिजीत बिचुकलेच्या ‘या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बिग बॉस मराठीतून घराघरात पोहोचलेला अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चित असतो. अभिजीतच्या वक्त्यव्यावरून अनेकांनी त्याची खिल्ली देखील उडवली आहे. तर अभिजीतला (Abhijit Bichukale)राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे हे त्यांनी अनेकदा बोलून देखील दाखवले होते. आता पुन्हा एकदा त्याच्या अशाच वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे.
नुकताच अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांचा लग्नाचा वाढदिवस पार पडला. यावेळी त्यांनी बायको सोबत फोटो शेअर करत एक जाहीर पत्रच लिहिले आहे. जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्राचे शीर्षक होते “महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री” यामध्ये बिचुकले यांनी लिहिले होते की, “महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री…. मी हे पहिल्यांदाच बोललेलो नाही या आधी देखील मी हे बोललेलो आहे. जेव्हा माझी पत्नी 2009 साली उदयनराजे यांच्या विरोधात पहिली लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मी असे बोललो होतो. माझ्या मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणाऱ्या महिलेला भारतीय संस्कृती बद्दल ज्ञान असणे गरजेचे आहे. ती माझ्या अर्धांगिनी प्रमाणे संस्कृती जपणारी पाहिजे आणि मी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना हा मुद्दा मांडणार आहे. महाराष्ट्राला तर आता माझ्या शिवाय पर्याय नाही”.
सध्या अभिजीतचे हे जाहीर पत्र चर्चेचा विषय बनत आहे. एकीकडे त्याच्या वक्तव्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे.
तर दुसरीकडे महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने विचार करत असल्याबद्दल त्याचे कौतुकही केले जात आहे.
Web Title :- Abhijit Bichukale | abhijeet bichukale i will make my wife the
first chief minister of maharashtra claims abhijeet bichukale
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime News | वकिलाची पोलीस अधिकार्याला मारहाण; मार्केटयार्ड परिसरातील घटना
- Pune Crime News | बहिण म्हणून ओळख सांगणार्या वडिलांना महिलेसोबत मुलीने पकडले रंगेहाथ लॉजवर;
मुलीला मारहाण करुन कोंडून वडिल, महिला पसार - Riya Kumari | रिया कुमारी हत्येप्रकरणात नवा ट्वीस्ट; पतीनेच रचला कट पोलिसांनी व्यक्त केला संशय