‘या’ वेगवान बॉलरमुळं क्रिकेट जगतात प्रचंड ‘खळबळ’, एका ओव्हरमध्ये घेतले 5 ‘विकेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सय्यद मुश्ताक अली टी -२० करंडकाच्या उपांत्य सामन्यात अभिमन्यू मिथुनने गोलंदाजी केली. शुक्रवारी सूरतमध्ये हरियाणाविरूद्ध झालेल्या सामन्यात ३० वर्षीय कर्नाटकचा वेगवान गोलंदाज मिथुनने एका षटकात ५ बळी घेत आपल्या नावावर एक अनोखे रेकॉर्ड कायम केले. हरियाणाच्या डावाच्या शेवटच्या षटकात अभिमन्यू मिथुनच्या चेंडूंनी रौद्र रूप धारण करून कहर केला. विकेट, विकेट, विकेट, विकेट, वाइड, एक धाव, विकेट. अशा पद्धतीने गोलंदाजी करत या षटकात फक्त २ धावा दिल्या आणि त्याने हॅटट्रिकसह ५ बळी देखील घेतले. मिथुनने या डावात ४ षटकांत ३९ धावा देऊन ५ बळी घेतले.

अभिमन्यू मिथुनच्या या सनसनाटी २० व्या षटकामुळे सगळीकडे खळबळ माजली आणि त्याचे कौतुकही खूप झाले. हरियाणा चा २० व्या षटकाआधी ३ बाद १९२ धावा इतका स्कोर होता. मिथुनच्या २० व्या षटकात ८ बाद १९४ धावा इतक्यावरच हरियाणाचा डाव थांबला. या षटकात हिमांशु राणा, राहुल तेवतिया, सुमित कुमार, अमित मिश्रा आणि जयंत यादव बळी पडले. बॅक टू बॅक डाव खेळत कर्नाटकने अवघ्या १५ षटकांत १९५/२ धावा केल्या आणि सामना ८ गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरी गाठली. त्यांचा सामना राजस्थान आणि तामिळनाडू दरम्यान १ डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसर्‍या उपांत्य सामन्यातल्या विजेत्याशी होणार आहे.

यावर्षी २५ ऑक्टोबरला विजय हजारे ट्रॉफी वनडे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मिथुनने तामिळनाडूविरुद्ध हॅटट्रिकसह पाच बळी (5/34) घेतले. यासह रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या तिन्ही गटांत हॅटट्रिक घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

मिथुन ची हैट्रिक,

विरुद्ध उत्तर प्रदेश, २००९ (फर्स्ट क्लास क्रिकेट- रणजी ट्रॉफी)

विरुद्ध तमिलनाडु, २०१९ (लिस्ट A- विजय हजारे ट्रॉफी )

विरुद्ध हरियाणा, २०१९ (टी-२०- सैयद मुश्ताक अली ट्रॉफी)

अखेर २०११ मध्ये टीम इंडियाकडून मैदानात उतरलेल्या अभिमन्यू मिथुनने ४ कसोटी सामने आणि ५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Visit : Policenama.com