अभिनंदनचे व्हिडीओ यु ट्यूब वरून तात्काळ हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात आलेला F-16 या विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसेनेकडून विमानांनी उड्डाण भरले होते. यात मिग -२१ या विमानाचा सामावेश होता. एकूण तीन विमानांपैकी एक विमान भारतात परतले नाही. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. या विमानात भारतीय वायुसेनचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. अभिनंदन यांचे व्हिडीओ,फोटो पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले आहेत. भारताने जिनिव्हा करारानुसार भारतीय कमांडर अभिनंदन यांना सुरक्षित भारतात सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आता अभिनंदन यांना उद्या भारतात पाठवले जाणार आहे. आता अभिनंदनचे यु ट्यूब वरील व्हिडीओ तत्काळ हटवण्याचे आदेश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत.

अभिनंदनाचे व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे पायलट अभिनंदन वर्तमान यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. युट्यूबवरही हे व्हिडिओ अपलोड करण्यात आले. त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने युट्यूबला हे व्हिडिओ तत्काळ हटवण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान पाकिस्तानने अभिनंदनची सुटका करण्याच्या घोषणेपुर्वी भारताने स्पष्ट केले की, भारताने कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला किंवा लष्कराला लक्ष्य केले नाही पण पाकिस्तानने मात्र भारतीय लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केले आहे. भारताने मुद्दामून LOC ओलांडलेली नाही. भारताने पाकिस्तानच्या युद्धनीतीच्या प्रयत्नांना फटका दिला आहे. त्यानंतर भारतीय दबावानंतर भारतीय वैमानिकाला सोडण्याची घोषणा केली.

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काही व्हिडिओमध्ये त्यांना मारहाण कऱण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ते आपली ओळख सांगत असून चहा घेत आहे. परंतु, व्हाॅट्सअॅप, युट्यूबवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

युट्यूबर तब्बल ११ व्हिडिओ काही महाभागांनी अपलोडही केले आहे. त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हे व्हिडिओ तत्काळ हटवण्याचे आदेश युट्यूब इंडियाला दिले आहे.