वर्षभरात पाकिस्तानात वर्षभरात Google वर सर्वाधिक ‘या’ दोन भारतीयांना सर्च केलं गेलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यावर्षी पाकिस्तानात गुगलवर सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या टॉप 10 लोकांमध्ये भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि बॉलवूड अभिनेत्री सारा अली खान यांच्या नावाचा समावेश आहे. गुगलनं याबाबत माहिती दिली आहे.

गुगल ट्रेंड्स सर्च इन इयर 2019 च्या यादीत भारताचा रिअ‍ॅलिटी टीव्ही शो बिग बॉस 13 दुसरा सर्वात जास्त ट्रेंडिंग सर्च आहे. तर टीव्ही शो मोटू पतलू या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ज्या लोकांना गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं आहे त्या आधारावरच ही यादी तयार करण्यात आली आहे.

बॉलिवूड स्टार सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान गुगलच्या सर्वाधिक सर्चच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. साराला तिचे सिनेमे आणि तिच्या अनोखा फॅशन सेंससाठी ओळखलं जातं. सारानं केदारनाथ सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ती सिंबा सिनेमात दिसली. लवकरच सारा 1995 साली आलेल्या कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

विंग कमांडर अभिनंदन गुगलच्या सर्वाधिक सर्चच्या यादीत 9व्या क्रमांकावर आहे. अभिनंदन या वर्षी फेब्रुवारीमध्ये चर्चेत आले होते. जेव्हा त्यांनी पाकिस्तानचं एफ 16 विमान हाणून पाडलं होतं. यात त्यांच्या विमानाचाही अपघात झाला होता. ज्यात ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. यानंतर पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं होतं. काही दिवसांनंतर पुन्हा ते मायदेशी परतले.

https://www.instagram.com/p/B1WyxdJDJXW/

 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/