’बाजवा यांचे पाय थरथरत होते, चेहरा घामाघुम झाला होता’, हल्ल्याच्या भितीनं विंग कमांडर ‘अभिनंदन’ला सोडलं

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भारत आणि मोदी सरकारची दहशत दिसून आली. ताज्या प्रकरणात पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी खुलासा करताना म्हटले आहे की, भारताच्या फायटर प्लेनचा पायलट अभिनंदन वर्धमान यास भारताच्या भितीपोटी पाकिस्तानने सोडले होते.

पाकिस्तानच्या संसदेत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी भारताच्या भितीचा खुलासा करताना म्हटले की, भारताच्या भितीपोटी मागच्या वर्षी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली होती. भारताला खुश करण्यासाठी अभिनंदनला सोडण्यात आले होते.

तर पाकिस्तान असेंब्लीचे माजी स्पीकर अयाज सादिक यांनी म्हटले, त्यावेळी पाकिस्तानला भिती होती की, भारत हल्ला करू शकतो. याच शक्यतेमुळे त्यावेळी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते आणि चेहरा घामाने डबडबला होता. बाजवा यांना भारताच्या हल्ल्याची भिती सतावत होती.

अयाज सादिक म्हणाले, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी थरथरत होते. अभिनंदन बाबत ते म्हणत होते की, खुदा के वास्ते त्यांना जाऊ द्या. पाकिस्तानला भिती होती की, जर फायटर प्लेन पायलट अभिनंदनला रात्री 9 वाजेपर्यंत सोडले नाही तर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल.

या प्रकरणावर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करत लिहिले आहे की, राहुल जी, तुम्ही सर्जिकल स्ट्राइक आणि एयर स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करत होतात ना? जरा पहा मोदीजींची किती दहशत आहे. पाकिस्तानमध्ये सरदार अयाज सादिक पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत बोलत आहेत की, पाकचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांचे पाय थरथरत होते आणि चेहर्‍यावर घाम होता, भारत अटॅक तर करणार नाही ना! समजलं?

काय आहे प्रकरण?
फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानने हल्ल्यासाठी फायटर जेट भारतात पाठवले होते. ज्यास उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या इतर विमानांसह विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-21 मध्ये उड्डाण घेतले होते. या दरम्यान, इतर भारताची विमाने हल्ला करून यशस्वीपणे परतली, पण अभिनंदन यांचे विमान अपघातग्रस्त होऊन कोसळले आणि पीओकेमध्ये पडले. जेथे त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने पकडले. मात्र, यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढला. ज्यानंतर अभिनंदनला अटारी-वाघा बॉर्डरवरून भारतात परत पाठवण्यात आले.

You might also like