अभाविपचे ‘छात्रगर्जना’ संमेलन भावे विद्यालयात संपन्न, पुणे महानगरच्या ‘कार्यकारणी’ची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीने दरवर्षी एक महानगरस्तरीय संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे छात्रगर्जना संमेलन भावे महाविद्यालय येथे करण्यात आले. यावेळी यामध्ये अभाविपच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा, अभाविपची आगामी भूमिका आणि पुणे महानगर स्तरावर काम करणारी महानगर कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. ह्यावेळी पुणे महानगर अध्यक्ष म्हणून डॉ. शरद गोस्वामी व महानगर मंत्री म्हणून अनिल ठोंबरे ह्यांची फेरनिवड करण्यात आली.

या छात्रगर्जना संमेलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध उद्योजक श्री. प्रल्हादजी राठी व प्रमुख वक्ते म्हणून अभाविप राष्ट्रीय महामंत्री श्री. आशिष चौहान हे उपस्थित होते. ह्या संमेलनात विद्यार्थी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आशिष चौहान ह्यांनी “विद्यार्थी परीषदेचं काम स्वतःच्या व्यक्तीमत्त्व विकासाबरोबरच राष्ट्राच्या विकासासाठी करावे”. तसेच ह्या वेळी त्यांनी अभाविपच्या कार्याचे सिंहावलोकन करून आगामी कार्याची माहिती दिली व उद्योजक प्रल्हादजी राठी ह्यांनी विद्यार्थी दशेतून उद्योजगतेकडे कसे जावे ह्यावर मार्गदर्शन केले.

‘सेल्फी विथ कॅम्पस’ अभियानाला सुरुवात

अभाविपने मागील वर्षी ‘सेल्फी विथ कॅम्पस’ अभियान राबवून शहरातील असंपर्कित महाविद्यालयांवर अभाविपचा संपर्क असावा ह्या उद्देशाने हे अभियान राबवले होते. यावर्षी तेच अभियान पुढे घेऊन संपर्क केलेल्या प्रत्येक महाविद्यालयावर शाखा करण्यासाठी अभाविप ‘सेल्फी विथ कॅम्पस युनिट’ हे अभियान संपूर्ण देशभरात दि. १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या दरम्यान राबवत आहे.

आरोग्यविषयक वृत्त