आराध्या बच्चनचा ‘कोरोना’ रिपोर्ट आला निगेटीव्ह !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महानायक अभिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांच्या कुटूंबातील सर्वांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन व जया बच्चन यांच्यासोबतच आराध्याचीही चाचणी करण्यात आली. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बच्चन कुटूंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

कोरोनाची बाधा झाल्यामुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अभिषेक बच्चनचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अभिषेकनेही ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. बिग बींच्या जलसा आणि जनक बंगल्यातील कर्मचार्‍यांचीही चाचणी केली जाणार आहे. गेल्या 10 दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनी चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like