अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला घडली होती ही घटना, हादरले होते बच्चन परिवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. 20 एप्रिल 2007 रोजी बच्चन घराण्याच्या प्रतिक्षा निवास येथे दोघांचं लग्न झालं होतं. 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. परंतु 2003 मध्ये हा साखरपुडा मोडला. लग्नापूर्वी एक घटना घडली होती जी मीडियामध्ये चांगलीच चर्चेत आली होती.

तब्बल बारा वर्षानंतर आता तेव्हा मीडियात चर्चेत असणाऱ्या घटनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अभिशेष आणि ऐश्वर्याच्या बरोबर एक दिवस आधी ही घटना घडली होती. लग्नाच्या आधी एक वेगळेच वळण आले होते. जान्हवी कपूर नावाच्या एक मॉडेलने गुरुवारी रात्री म्हणजे 19 एप्रिल 2007 रोजी प्रतिक्षा बंगल्यासमोर आपल्या हाताची नस कापून घेतली होती.

या मॉडेलने असा दावा केला होता की, अभिषेक आणि तिची दस या सिनेमादरम्यान जवळीक वाढली होती. याशिवाय जान्हवीने अभिषेकवर अनेक गंभीर आरोप केले होते. या मॉडेलने तर असाही धक्कादायक खुलासा केला होता की, काही मित्रांच्या साक्षीने या दोघांनी लग्नही केलं होतं.

जान्हवीने अभिषेकसोबत दस बहाने या गाण्यात काम केलं होतं. जेव्हा मॉडेल जान्हवी कपूरला काही पुरावा आहे का असे विचारण्यात आले तेव्हा तिने सांगतिले की, प्रेमाला कसल्याही पुराव्याची गरज नसते. सुसाई़ड करण्याच्या आरोपाखाली जान्हवीला अटकदेखील झाली होती. या घटनेने पूर्ण बच्चन परिवार हादरू गेले होते.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला आज 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी रावण, कुछ न कहो आणि गुरु यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. मनिरत्नम हा त्यांचा शेवटचा सिनेमा आहे. या दोघांची रिअल लाईफ केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Loading...
You might also like