ऐश्वर्याची ही एक सवय नाही आवडत श्वेता नंदाला 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये आजपर्यंत अनेक सेलीब्रेटींनी हजेरी लावली आहे. तसेच या शोमध्ये केलेल्या वक्तव्यावरून अनेक जणांवर टीका होत असल्याचेही पहायला मिळते. तरीही या शोची प्रचंड लोकप्रियता आहे. शोमध्ये येऊन कलाकार एकमेकांबद्दल अनेक खुलासे करताना दिसतात. नुकतेच या शोमध्ये अभिषेक बच्चन आणि बहीण श्वेता नंदा यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात श्वेताने ऐश्वर्याच्या सवयीं बद्दल खुलासा केला आहे.

या कार्यक्रमात करणने श्वेताला विचारले तुला ऐश्वर्याची कोणती सवय आवडत नाही यावर तिने उत्तर दिले ऐश्वर्या फोन आणि मेसेजचे उत्तर खुप वेळाने देते तिची ही सवय मला आवडत नाही तसेच तिने ऐश्वर्याचे कौतुक करत सांगितले ती एक सेल्फ मेड स्ट्रॉंग महिला असून तिची ही गोष्ट मला खूप आवडते. तसेच अभिषेक म्हणाला तो आपल्या आईचा जवळचा आहे, तर श्वेताने मैं पिता के आंखों का तारा हू असे सांगितले.

आतापर्यंत शोमध्ये अर्जुन कपूर-जान्हवी कपूर, सोनम कपूर-रिया कपूर-हर्षवर्धन कपूर, शाहिद कपूर-ईशान खट्टर अशा सेलिब्रेटींची जोडी या शोमध्ये पहायला मिळाली आहे. आणि या सेलिब्रेटी भाऊ-बहिणींच्या जोडींनी एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.