Abhishek Bachchan | अभिषेक बच्चनने ‘मामलेदार मिसळ’ चा उल्लेख करत केला ‘हा’ खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असतो. शिवाय महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा असल्याने कायम स्टारकिड्सच्या यादीमध्ये अव्वल स्थानी राहिला. तसेच बॉलिवूडमध्येही त्याने वेग-वेगळ्या भूमिका साकारून स्वतःची ओळख तयार केली. शिवाय अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा त्याच्या शांत स्वभावामुळे देखील ओळखला जातो.

 

अश्या या शांत स्वभावाच्या माणसाला ठाण्यातील मामलेदाराची झणझणीत मिसळ आवडते. काही महिन्यांपूर्वी अभिषेक बच्चन याने ‘बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. त्यामध्ये त्याने मुंबईतील खाद्यसंस्कृतीवर भाष्य केले होते. यात त्याने त्याला ठाण्याची मामलेदार यांची मिसळ आवडते असा म्हणाला पुढे तो हेही म्हणला कि “माझ्या मते उत्तम मिसळ ही ठाण्यातून येते आणि ती म्हणजे मामलेदार मिसळ”. त्यामुळे सामान्य जनतेप्रमाणेच बच्चन कुटुंबीयांमधेही या झणझणीत मिसळीची क्रेझ आहे असं म्हणायला हरकत नाही.

 

मामलेदार मिसळला सात दशकांची लज्जतदार अशी परंपरा आहे. लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी 1946 मध्ये तेव्हाच्या ठाणे मामलेदार कचेरीबाहेरची जागा व्यवसायासाठी शासनाकडून भाडेतत्वावर घेतली होती. त्यांच्या पश्चात लक्ष्मणशेठ यांनी नरसिंह मुर्डेश्वर यांची परंपरा अखंडीत सुरु ठेवली. मामलेदार मिसळला सात दशकांची लज्जतदार अशी परंपरा आहे. ‘मामलेदार मिसळ’ हा आज एक ब्रँड बनला आहे.

 

अभिषेकच्या (Abhishek Bachchan) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी त्याची ‘ब्रीद: इनटू द शॅडोज 2’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली.
2020मध्ये या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.
या लोकप्रिय सीरिजद्वारे अभिषेक बच्चनने ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केले होते.
यानंतर तो लवकरच अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटात दिसणार आहे.

 

Web Title :- Abhishek Bachchan | bollywood actor abhishek bacchan love thanes famous mamledar misal pav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास