अभिषेक बच्चनशी बोलला यूजर – तुझी सुंदर बायको ऐश्वर्याला पाहून वाटतो हेवा, मिळाले मजेदार उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन जरी आपले वडील अमिताभ बच्चन यांच्या एवढे नाव कमावू शकला नसला तरी यामध्ये काहीही शंका नाही की, तो एक चांगला कलाकार आहे आणि सोबतच एक चांगला माणूस आहे. अभिषेक बच्चनला बॉलीवुडच्या मोस्ट डिसेन्ट अ‍ॅक्टर्सपैकी एक मानले जाते जो आजपर्यंत कोणत्याही कंट्रव्हर्सीमध्ये पडलेला दिसला नाही. परंतु सोशल मीडियावर जेव्हा ट्रोल्सला उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा त्यापासून अभिषेक बच्चन कधीही मागे सरकत नाही. नुकतेच त्याने एका अशाच ट्रोल्सला सडतोड उत्तर दिले जो त्याच्या पर्सनल लाइफवर अनावश्यक कमेंट करत होता.

अलिकडेच अभिषेक बच्चनचा चित्रपट द बिग बुल चा ट्रेलर रिलिज करण्यात आला. यावर एका व्यक्तीने कमेंट करत लिहिले की – तु काही कामाचा नाही मित्रा. केवळ तुझ्या एका वस्तूचा मला हेवा वाटतो, ती म्हणजे, एवढी सुंदर वाईफ मिळाली आहे. अभिषेक सुद्धा यावर मागे हटला नाही. त्याने मजेदार प्रकारे ट्विटर यूजरला कानपिचक्या दिल्या. त्याने लिहिले – मत मांडल्यामध्ये धन्यवाद. पण मी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की, तुम्ही कुणाबद्दल बोलत आहात? कारण तुम्ही तर सर्वांना टॅग केले आहे. मला माहित आहे इलियानी आणि निक्की तर विवाहित नाही. तर राहिलो मी, अजय, कुकी आणि सोहम. वाटते की, डिज्नीचे सुद्धा मॅरिटल स्टेटस चेक करावे लागेल.

आमने-सामने वडील आणि मुलाचे चित्रपट
अभिषेकचा हा रिप्लाय फॅन्स खुप पसंत करत आहेत. अभिषेक यापूर्वी सुद्धा आपल्या वडीलांसोबत तुलना आणि अ‍ॅक्टिंगवर ट्रोल झाला आहे, प्रत्येकवेळी त्याने आपल्या सौम्य शैलीत ट्रोल्सला सडेतोड उत्तर दिले आहे. वर्क फ्रंटबाबत बोलायचे अभिषेक आपल्या वडीलांसोबत प्रोफेशनल क्लॅशबाबत सुद्धा चर्चेत आहे. बॉलीवुडच्या इतिहासात क्वचितच असे झाले असेल की, जेव्हा वडील आणि मुलाचे चित्रपट आमने-सामने आले असावेत. एकीकडे अमिताभ बच्चनचा चित्रपट चेहरे आहे तर दुसरीकडे अभिषेक बच्चनचा चित्रपट द बिग बुल आहे. आता फॅन्सला कोण जास्त पसंत पडते हे आगामी काळच सांगणार आहे.