ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेक बच्चननं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडमधील पावर कपलपैकी एक आहे. अलीकडेच अशा अफवा पसरत होत्या की, दोघांमध्ये काहीच आलबेल नाही. कारण एका इव्हेंटमधील एक जुना व्हि़डीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, अभिषेक आणि ऐश्वर्या वेगळं होण्याचा विचार करत आहेत. याबद्दल अभिषेक बच्चनला एका मुलाखतीत विचारल्यानंतर तो म्हणाला की, मला माहित आहे सत्य काय आहे आणि मीडियाला किती गंभीरतेनं घ्यायचं.

अभिषेक पुढे बोलताना म्हणाला की, त्यांच्या नात्यात तिसऱ्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्याला हेही सांगण्याची गरज नाही की, त्यानं त्याचं आयुष्य कसं जगावं. पत्नीला माहित आहे की, त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे. काही लोका त्यांच्या चांगल्यासाठी काही चुकीच्या बामत्या बनवत असतील तर बनवा. मी एक पब्लिक फिगर आहे. सोशल मीडियाला तो खुश करू शकत नाही असंही तो म्हणाला.

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो ब्रीथ सीजन 2 या आगामी सिनेमात दिसणार आहे. याशिवाय त्यानं बॉब बिस्वास या सिनेमाचीही शुटींग सुरू केली होती. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यानं सारं काही ठप्प आहे.