‘नेपोटीजम’च्या वादाच्या काळात अभिषेक बच्चननं सांगितलं दु:ख, म्हणाला – ‘अनेक डायरेक्टर आणि प्रोड्युसर्सला काम मागितलं पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. काही लोक डिप्रेशनवरही बोलताना दिसत आहेत. अनेक किस्सेही आता समोर येताना दिसत आहेत. सुशांतच्या निधनानंतर लोकांनी अनेक स्टार्सला नेपोटीजमच्या नावाखाली टारगेट केलंय तर काहींनी इशारो-इशारोंमध्ये इंडस्ट्रीतील सत्य सांगितलं आहे.

बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यानंही आता एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये अभिषेक म्हणतो, ” साल 2009… दिल्ली 6 आणि पा. अनेकांना हे माहिती नसेल की, 1998 मध्ये मी आणि राकेश ओमप्रकाश मेहरा एकत्र आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार होतो.”

अभिषेक पुढं म्हणतो, “आम्ही खूप प्रयत्न करूनही कोणीच आम्हाला लाँच करणारं भेटलं नाही. मला आता हेही आठवत नाही की, मी किती प्रोड्युसर आणि डायरेक्टर्सला भेटलो असेल आणि त्यांना विनंती केली असेल की, मला अ‍ॅक्टींगासाठी संधी द्या. परंतु कोणीही संधी दिली नाही. आम्ही निर्णय घेतला की, असं काही तरी करूयात ज्याला राकेश डायरेक्ट करू शकेल आणि मी त्यात अॅक्टींग करेल. अशा प्रकारेच समझौता एक्सप्रेसचा जन्म झाला. हा सिनेमा बनू शकला नाही याबद्दल आजही वाईट वाटतंय. यानंतर राकेश माझ्या वडिलांसोबत अक्स बनवायला लागले. नशीबानं मी आणि पापा जेपी साहेबांना भेटलो. त्यांना माझा लुक आवडला. जेपी साहेब आखिरी मुगल बनवण्याचा विचार करत होते आणि यासाठी त्यांन नवीन चेहरा हवा होता. मी लकी होतो. त्यांना आखिरी मुगल तर नाही पण रेफ्युजी बनवला.”

अभिषेक म्हणतो, “10 वर्षांनंतर राकेश मी एकत्र काम करू शकलो. आम्ही एकत्र दिल्ली 6 बनवला. आम्ही कुटुंबासारखं होत. स्टारकास्ट छान होती. हा सिनेमा सोनम कपूरचा दुसरा सिनेमा होता. यानंतर मी वडिलांसोबत पा आणि विद्या बालनसोबतही काम केलं.”