Birthday Special : घरात आईला जास्त घाबरतोस की बायकोला ? अभिषेक बच्चन म्हणतो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आज(दि 5 फेब्रुवारी) आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत झाला. आज वाढदिवसानिमित्त अभिषेकवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की, घरात अभिषेक कोणाला जास्त घाबरतो. अभिषेक बायकोला घाबरतो की आईला याचा खुलासा खुद्द अभिषेकनंच केला आहे.

कॉफी विथ करण या शोमध्ये मागच्या वर्षीच्या एका भागात अभिषेक बच्चन आणि त्याची बहिण श्वेता बच्चन नंदा हिनं हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भरभरून गप्पा मारल्या. या भागातील रॅपिड फायरच्या सेशनवेळी अनेक धम्माल उडवून देणारे खुलासे समोर आले.

करणनं अभिषेक बच्चनला विचारलं की, घरात सगळ्यात जास्त कोणाला घाबरतोस ? बायकोला की आईला ? यावर लगेचच उत्तर देत अभिषेक म्हणाला, आईला. परंतु श्वेतानं मात्र वेगळंच काही सांगितलं. श्वेताच्या मते अभिषेक घरात आई जया बच्चनला नव्हे तर बायकोला म्हणजेच ऐश्वर्याला जास्त घाबरतो.

श्वेतानं हा खुलासा केल्यानंतर अभिषेकही लटक्या रागानं तिला म्हणाला, प्रश्न मला विचारला आहे मग तू उत्तर का देतेयस ? अभिषेकचा हा एपिसोड तेव्हाही खूप चर्चेत राहिला होता. अभिषेक आणि ऐश्वर्यानं 2007 मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी त्यांचं लग्न खूप चर्चेत राहिलं होतं.