अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला आहे. एवढचं नाही तर बिग बी यांचे वडील म्हणजेच डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी आणि लेखक होते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंबाची मोठी प्रतिष्ठा असून विशेष स्थान आहे.

नुकतेच अभिषेक बच्चनने आरजे सिद्धार्त ला एक मुलाखत दिली. आरजे सिद्धार्थशी बोलताना अभिषेक म्हणाला, “आराध्या आता फक्त नऊ वर्षांची आहे आणि सध्या ती ऑनलाईन शाळेत व्यस्त आहे. आपले आजी-आजोबा आणि आई-वडील अभिनय क्षेत्रात असून आज लोखो लोक त्यांच्यावर प्रेम करतात त्यांचा आदर करतात याची आराध्याला कल्पना आहे. त्यामुळे ऐश्वर्यानी तिला इतरांचा आपणही आदर व्यक्त करायला आणि त्याची प्रशंसा करायला शिकले पाहिजे आणि देवाचे कायम आभार मानले पाहिजे हे शिकवंल आहे. ती ठिक आहे.तिच्यासाठी या गोष्टी आता सामान्य आहेत. ती आमचे सिनेमा पाहते आणि एन्जॉय करते.” असं अभिषेक म्हणाला.