‘ब 12’ जीवनसत्व शरीरासाठी खुप आवश्यक, मिळवण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आपल्या शरीराला विविध प्रकारच्या जीवनसत्वांची गरज असते. यातील एखाद्या जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाली असल्यास अनेक शारीरीक समस्या निर्माण होतात. असे एक महत्वाचे जीवनसत्व म्हणजे ब 12 हे होय. ते आहारातून मिळते. शरीर ते तयार करू शकत नाही. लाल रक्तपेशी आणि डीएनए निर्मितीसाठी याची महत्त्वाची भूमिका असते. मज्जासंस्थेचे आणि प्रतिकारशक्तीचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे.

या पदार्थांमधून मिळते

1 चिकन, 2 मासे, 3 अंडी, 4 चीज, 5 दही, 6 डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेण्याचा पर्याय आहे.

हे लक्षात ठेवा

या जीवनसत्त्वाच्या शोषणात वेगवेगळ्या एन्झाईम्सचा समावेश असतो. त्यामुळे काही पदार्थांचा आहारात समावेश करणे, पुरेसे नाही.

*  शरीरामध्ये ते शोषून घेण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी, यंत्रणा योग्य ठिकाणी असण्याची व त्यांनी व्यवस्थित कार्य करण्याची आवश्यकता असते.

शरीरामध्ये एन्झाईम निर्मितीमध्ये काही समस्या असल्यास, रिसेप्टर ठीक काम करत नसल्यास व इतर घटकांमध्येही अडचण असल्यास शोषणास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, अशी व्यक्ती ब 12 जीवनसत्त्वाचे शोषण करू शकत नाही.