नरेंद्र मोदींना नेहमी खलनायक संबोधने चूक, ‘या’ 2 दिग्गज काँग्रेस नेत्यांचं मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्विटर वर एक ट्विट करत काँग्रेसचे जेष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले कि , नेहमीच मोदी यांना खलनायक ठरवणे अत्यंत चुकीचेच आहे. त्यामुळे त्यांनाच जास्त फायदा होतो. अखेर ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. उचलली गेलेली पावले नेहमीच चांगली, वाईट किंवा खराब असू शकतात. त्यांचा घटनापरत्वे अर्थ लावला पाहिजे. जोखलं गेलं पाहिजे. अनेक योजनांपैकी उज्वला योजना एक अशी योजना आहे ज्या योजनेचे कौतुकच केले पाहिजे.

जयराम रमेश यांचे समर्थन
सिंघवी यांनी आपल्याच पक्षाचे एक जेष्ठ नेते जयराम रमेश यांचे समर्थन केले. मोदींना नेहमी खलनायक ठरवणे चुकीचेच असा उच्चार जयराम नरेश यांनी केला होता. बुधवारी राजनैतिक विश्लेषक कपिल कोमिरेड्डी यांच्या मेलिवॉलेंट रिपब्लिक : ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ द न्यू इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन करताना जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे मॉडेल पूर्णपणे नकारात्मक नक्कीच नाही. तर त्यांच्या कामाचे महत्व स्वीकारले पाहिजे. प्रत्येक वेळेस त्यांना खलनायक म्हणून बघितल्याने काहीही फायदा होणार नाही. २०१४ ते २०१९ दरम्यान मोदींनी केलेली कामे आपण माहीती करून घेतली पाहिजे . त्या कामाच्या जोरावरच ते पुन्हा सत्तेवर आले आहेत. त्यामुळेच ३० टक्के जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली.

थरूर यांनीही ट्विटला उत्तर देत केले समर्थन
काँग्रेसचे खासदार शशी थरूर त्यांनी जयराम रमेश यांचे समर्थन करत म्हणाले कि, मागच्या अनेक वर्षांपासून मी हेच सांगतोय कि, मोदी यांच्या चांगल्या योजनांचे कौतुक करा आणि त्यामध्ये काही कमी असतील तर त्यावर टीका करा. त्यामुळे आपली विश्वासार्हता वाढीस लागेल. माझ्या या मतासारखे बोलणाऱ्यांचा अथवा माझ्या मताशी साधर्म्य असेल अशा व्यक्तींचं मी स्वागत करतो.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही केले समर्थन
पूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटला उत्तर देत ‘बरोबर आहे सर’ राष्ट्र निर्माणाचे कार्य हि एक निरंतर प्रक्रिया आहे. हे काम तत्कालीन सर्व सरकारांनी पुढे चालवले आहे. मी अशा करते कि, मोदीजी आणि त्यांच्या टीमला याची जाणीव असेल. पंडित नेहरूंना चुकीच्या पद्धतीने न घेता त्यांचे तसेच काँग्रेसचे तत्कालीन मोठे योगदान योगदान लक्षात घेतले पाहिजे. योजनांवर टीका झाली पाहिजे, व्यक्तिगत टीका नको करायला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like