अक्षय नाही तर ‘हा’ अभिनेता दिसणार इंडियन-२ चित्रपटात ?

मुंबई : वृत्तसंस्था – काही दिवसापूर्वी कमल हसन यांच्या इंडियन-२ या चित्रपटात खलनाय म्हणून अक्षय कुमार याची वर्णी लागली असे वृत्त समोर आले होते. परंतु एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार या चित्रपटात अक्षय नाही तरअभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये  काम करण्यासाठी दिग्दर्शक शंकर यांनी प्रथम अजय देवगण याला विचारले होते परंतु त्याने ही भूमिका साकारायला नकार दिल्या नंतर ही भूमिका अक्षय करणार असल्याची  चर्चा होती.
इंडियन-२  या चित्रपटात कमल हसन मुख्य भूमिकेत आहे व लवकरच चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या संदर्भात अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी इंडियन 2 या चित्रपटाच्या माध्यमातून अभिषेक तामिऴ सिनेमात पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे.अमिताभ आणि कमाल हासन यांनी काही हिंदी चित्रपटात एकत्र काम केले आहे जर अभिषेक या चित्रपटात दिसून आला तर अभिषेक आणि कमल हासन यांच्या केमिस्ट्रीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
काही दिवसापूर्वी इंडियन -२ चे पोस्टर समोर आले होते या पोस्टरमध्ये वृद्ध, परंतु अनुभवी व कठोर अशा सेनापतीच्या रुपात कमल दिसले होते . विशेष म्हणजे  इंडियन -२ हा चित्रपट कमल हासन यांचा शेवटचा चित्रपट असणार आहे या चित्रपटानंतर ते अभिनय क्षेत्राला राम राम ठोकणार असून राजकारणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे कमल हासन यांच्या चाहत्यांना या चित्रपटाची नक्कीच उत्सुकता असणार आहे.