24 आठवड्यांनीही ‘गर्भपात’ करणं शक्य, सुधारीत कायद्याला कॅबिनेटची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गर्भपाताच्या मुदतवाढीला केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिल्यानंतर आता भारतात 24 आठवड्यांनंतरही गर्भपात करणं शक्य होणार आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी अ‍ॅक्ट 1971 मध्ये बदल केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक सादर केलं जाणार आहे. सुधारीत गर्भपात कायद्यानुसार आता गर्भपाताची 20 आठवड्यांची मुदत 24 आठवडे केली जाणार आहे.

भारतात सध्याच्या स्थितीला कायद्यानुसार, गर्भपात करण्याचा कालावधी 20 आठवडे आहे. जर यापेक्षा जास्त कालावधी असेल तर गर्भपात करता येत नाही. तसं केल्यास गुन्हा नोंदवला जातो. गर्भपाताचा कालावधी 20 आठवडे असल्यानं ग्राभीण भागात असुरक्षित गर्भपाताचं प्रमाण वाढताना दिसत आहे. बऱ्याचदा असंही होतं की, प्रेग्नंट असताना काही गुंतागुंत निर्माण होते आणि आईचा जीव वाचवण्याच्या हेतूनं गर्भपात करावा लागतो. परंतु डॉक्टर परस्पर असा निर्णय घेऊ शकत नाहीत. यासाठी त्यांना कोर्टाची पवानगी घ्यावी लागते.

जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल आहे. त्यात असं सांगितलं आहे क भारतात प्रत्येक वर्षी 17 लाख मुलं ही व्यंगासह जन्माला येतात. आता गर्भपात कायद्यात जर बदल केला गेला तर हे प्रमाण कमी होऊ शकतं असंही या अहवालात म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा