LIC ची पॉलिस घेणार्‍यांसाठी अत्यंत मोठी बातमी ! ‘या’ तारखेनंतर बंद होणार 24 पेक्षा अधिक ‘स्कीम’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या अनेक योजना लवकरच बंद होणार आहेत. यामध्ये दोन डझनपेक्षा अधिक वैयक्तिक विमा योजना, 8 ग्रुप इंश्योरेंस प्रोडक्ट आणि 7 ते 8 रायडर्स योजना 30 नोव्हेंबरपासून बंद होणार आहेत. यामध्ये जीवन आनंद पॉलिसी, जीवन उमंग, जीवन लक्ष्य आणि जीवन लाभ यांसारख्या विमा योजनांचा समावेश आहे.

काही महिन्यांत होणार रिवाइज आणि रिलॉन्च
बंद करण्यात येणाऱ्या या सर्व योजना काही महिन्यांतच रिवाइज आणि रिलॉन्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार असून मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा फायदा होणार आहे.

75-80 विमा योजना होणार बंद
मिळालेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबरनंतर 75-80 विमा योजना बंद होणार असून या सर्व योजना 8 जुलै 2019 रोजी सुरु झालेल्या इन्शुरन्स प्रॉडक्ट रेग्युलेशन नुसार नसल्यामुळे बंद करण्यात येणार आहेत.

विमा क्षेत्रात विशेष फरक नाही
या निर्णयाचा विमा क्षेत्रावर विशेष फरक पडणार नसून यामुळे काहीही तोटा होणार नसल्याचे विमा क्षेत्रातील व्यक्तींनी सांगितले आहे. नियमांनुसार नसल्यामुळे या योजना बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे विविध योजना यापुढे सुरु राहणार असून काही योजनांमुळे विशेष फरक पडणार नाही.

Visit : Policenama.com