Coronavirus : ‘कोरोना’च्या ‘त्या’ 191 रूग्णांनी दिल्ली सरकारची उडवली झोप ! ‘हे’ आहे कारण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे सतत वाढत असून शुक्रवारपर्यंत रूग्णांची संख्या १७०७ वर पोहोचली. यापैकी १९१ लोकांना कोरोना कसा झाला हे अद्याप कळू शकले नाही. सरकारी आकडेवारीनुसार १७०७ पैकी १०८० रुग्ण निजामुद्दीनच्या मरकजशी संबंधित असून स्थानिक पातळीवर संक्रमितांची एकूण ३५३ प्रकरणे आहेत. याशिवाय परदेशातून प्रवास करून ८३ जण दिल्ली येथे आले होते. परंतु १९१ रूग्णांविषयी अजून काही कळू शकलेले नाही.

१९१ लोकांना कसा झाला कोरोना ?
एका वृत्तसंस्थेनुसार, दिल्ली सरकारचे अधिकारी यासंदर्भात शोध घेत आहेत कि १९१ लोकांमध्ये कोरोना कसा पसरला. या रुग्णांशी सतत संवाद साधने चालू असते. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसली होती का, याबाबत त्यांना विचारले जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही संख्या फार मोठी नाही, सतत ट्रॅक केले जात आहे. बरेच लोक पूर्ण माहितीही देत नाहीत. या व्यतिरिक्त बरेच लोक आजारी पडण्यापूर्वी ते कुठे-कुठे गेले होते हे देखील विसरले आहेत.

अतिशय आवश्यक आहे हा डेटा
मेडिकल स्टाफचे म्हणणे आहे की, काही रुग्णांनी हॉस्पिटलला योग्य माहिती दिलेली नाही. एका अधिकाऱ्याने दावा केला आहे की, त्यांना लवकरच याबाबत यश मिळेल कि या रुग्णांना कोरोना कसा झाला ते. तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या सोर्सबाबत शोध लावणे गरजेचे आहे. तेव्हाच याचा प्रसार रोखू शकतो.

दुसऱ्या राज्यांतील रुग्णही येतात
सफदरजंग हॉस्पिटलचे डॉक्टर जुगल किशोर यांनी म्हटले, ‘दिल्लीत इतर राज्याचे बरेच रुग्ण आहेत आणि त्यांचा तपशील नोंदवण्यात व राखण्यात चुका होतात. संख्या चिंताजनक नाही, परंतु त्याला ट्रॅक करण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. स्वाइन फ्लू प्रादुर्भावाच्या वेळीही याप्रकारची प्रकरणे समोर आली होती.’