Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 48916 नवे पॉझिटिव्ह, फक्त 2 दिवसांमध्ये 12 हून 13 लाखावर पोहचला बाधितांचा आकडा

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा कहर थांबवण्याचे नाव घेत नाही. मागच्या दोन दिवसात कोविड-19 संसर्गाच्या एक लाख नव्या केस समोर आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार शुक्रवारी देशात कोरोनाची 48,916 प्रकरणे समोर आली, तर 757 रूग्णांना आपला जीव गमवावा लागला. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 13 लाख 36 हजार 861 कन्फर्म केस झाल्या आहेत. तर यापूर्वी गुरूवारी देशात कोरोनाची 49,310 नवी प्रकरणे समोर आली होती, तर 740 रूग्णांचा मृत्यू झाला होता.

देशात कोरोनाच्या आता 4 लाख 56 हजार 071 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 31 हजार 358 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 8 लाख 49 हजार 431 लोक बरे झाले आहेत. कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट 63.50% झाला आहे. जगभरात भारत कोरोना संसर्गाच्या प्रकरणात तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे.

https://twitter.com/ANI/status/1286876301912023042

महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,615 लोकांना संसर्ग झाला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या काळात 278 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकुण 3,57,117 लोक शुक्रवारपर्यंत कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील 24 तासात झालेल्या 278 मृत्यूंसह राज्यात मृतांची संख्या वाढून 13,132 झाली आहे. शुक्रवार विविध हॉस्पिटलमधून उपचारानंतर 5,714 लोकांना घरी पाठवण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकुण 1,99,967 लोक कोरोना व्हायरस संसर्गातून मुक्त झाले आहेत.

गुजरातमध्ये 53 हजारच्या पुढे संक्रमित
गुजरातमध्ये संसर्गाची 1,068 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या शुक्रवारी 53,000 च्या पुढे गेली. आरोग्य विभागाने म्हटले की, संक्रमित रूणांची संख्या आता 53,631 आहे. संपूर्ण राज्यात संक्रमणामुळे मागील 24 तासात 26 लोकांचा मृत्यू झाला, ज्यानंतर एकुण मृत्यूंची संख्या 2,283 झाली आहे. अहमदाबाद जिल्ह्यात मागील 24 तासात 176 नवी प्रकरणे समोर आल्याने एकुण संक्रमितांची संख्या जिल्ह्यात 25,349 झाली. तर आणखी तीन लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 1,568 झाली आहे. 872 रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर बरे झालेल्या रूग्णांची एकुण संख्या 38,830 झाली आहे. गुजरातमध्ये सध्या 12,518 रूग्णांवर उपचार सुरू आहे.

बिहारमध्ये कोरोनामुळे 9 मृत्यू, एकुण मृत 221
बिहारमध्ये मागील 24 तासात शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 221 नवी प्रकरणे समोर आली आणि 9 लोकांचा मृत्यू झाला. तर 1,800 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात एकुण संक्रमितांची संख्या 33,511 झाली आहे. आरोग्य विभागाच्या बुलेटिननुसार मुजफ्फरपुर आणि रोहतासमध्ये 2-2, पटना, नालंदा, पश्चिम चंपारण आणि सुपौलमध्ये 1-1 व्यक्तीचा मृत्यू झाला. सुपौलमध्ये संसर्गाने पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानात सुमारे 35 हजार केस
राजस्थानात कोरोना व्हायरस संक्रमणामुळे शुक्रवार आणखी 8 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या 602 झाली आहे. यासोबतच राज्यात 958 नवी प्रकरणे समोर आल्याने आतपर्यंत एकुण प्रकरणांची संख्या 34,178 झाली आहे, ज्यापैकी 9029 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.