भय्यू महाराजांनी मृत्युबद्दलचा तो ‘मंत्र’ केला होता ट्विट

इंदौर : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी आज (मंगळवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी बंदुकीतून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर भय्यूजी महाराजांनी ट्विटर वर मृत्युबद्दलचा एक संस्कृत मंत्र आणि महादेवाचे छायाचित्र असलेले पोस्टर ट्विट केले होते. भैय्यु महाराजांनी आज एकूण पाच ट्विट केले होते.

मासिक शिवरात्रीच्या (महाशिवरात्री) सर्व भक्तांना त्यांनी या ट्विट मधून शुभेच्छाही दिल्या होत्या. संस्कृतचे गाढे अभ्यासक,दार्शनिक,पद्म विभूषण गोपीनाथ कविराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांनी कविराज यांना ट्विटरद्वारे वंदनही केले होते. यानंतर महाराजांनी शिवरात्रीबद्दल माहिती देणारे आणि महत्व सांगणारे ट्विट केले होते. त्यांनी शेवटचे ट्विट मृत्यूच्या अर्धा तास अगोदर केले होते. ज्यात महादेवाला मागणे मागितले आहे, महादेवाच्या तीन महत्वाच्या मंत्रांमध्ये याचा समावेश होतो. आध्यात्मिक शास्त्रात या मंत्राला फार महत्व दिलेले आहे. भय्यू महाराजांनी ट्विट केलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा होतो ‘हे मृत्यूला जिंकलेल्या महादेवा, ‘तुला शरण आलेला मी, जन्म , मृत्यू , वृद्धत्व, व्याधींनी पीडित असलेला आणि कर्म बंधनात अडकलेल्या मला मुक्त कर, या सर्व संकटामधून माझी रक्षा कर..

मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम ।
जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं कर्म बंधनः ।।

भय्युजी महाराज यांची गोळी झाडून आत्महत्या

भय्यू महाराजांच्या खोलीत सुसाईड नोट सापडली

भय्यूजी महाराजांचे ‘ते’ शेवटचे पाच ट्विट

भय्यूजी महाराज यांचा जीवन प्रवास