पालघरमध्ये दोन तरुणांची विष पिऊन आत्महत्या, संपूर्ण जिल्हात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्हातील वाडा तालुक्यातील सारसी येथील विशाल ज्ञानेश्वर ठाकरे आणि कोने येथील धीरज अधिकारी या दोन तरुणांचा वेगवेगळा कारणास्तव एकाच दिवशी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या एकाच दिवशी झालेल्या आत्महत्तेच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

आजाराला कंटाळून आत्महत्या
वाडा तालुक्यातील सारसी येथील रहिवासी असलेल्या विशाल ठाकरे यांने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. विशाल ठाकरे हा तरुण विवाहित असून दीड महिन्यांपूर्वीच त्याचे विवाह झाला होता. विशाल आजारी असल्याचे समजते. याचमुळे विशालने आजारपणाला कंटाळून आणि मानसिक तणावातून आत्महत्येचा मार्ग निवडला. धीरजने सकाळच्या सुमारास विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
याच दिवसी दुसरा तरुण धीरज अधिकारी यांने देखील आत्महत्या केली आहे. हा तरुण कोने येथील आहे. या तरुणाने देखील विष प्राशन करुन आत्महत्येचा मार्ग निवडला. धीरजच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणांच्या वाढत्या आत्महत्येमुळे पालकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या आत्महत्येमुळे तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे.

खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी वैद्यकीय अधिकारी नेमण्याची भारिपकडून मागणी

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …