मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टेम्पो चालकावर चाकू हल्ला करून रोकड लुटणाऱ्या आणि मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई सुतारदरा मित्रमंडळ येथे सापळा रचून करण्यात आली. अमोल भाऊ गोणते (वय-24 रा. चावसर ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

आरोपी अमोल गोणते याने त्याच्या साथिदाराच्या मदतीने 3 ऑगस्ट 2018 मध्ये खडकवासला येथील धरण चौकात एका टेम्पो चालकावर चाकून हल्ला करून त्याच्याकडून 23 हजार रुपये लुटून टेम्पोची काच फोडून फरार झाला होता. आरोपी गोणते याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार दरोड्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. या गुन्ह्यातील इतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, गोणते हा मागील एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, पोलीस शिपाई कैलास साळुंके, नितीन रावळ, विल्सन डिसोझा, किशोर शिंदे, दत्तात्रय गरुड, दिपक मते, अनिल शिंदे, पोलीस हवालदार क्षीरसागर, रोहिदास लवांडे, प्रविण तापकीर, रामदास गोणते, गजानन गानबोटे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like