चाकण येथील वाईन शॉप मालकाला लुटणा-या फरार गुंडाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण येथील वाईन शॉप मालकाला लुटल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. खेड तालुक्यातील दावडी येथील गुंड किरण शिवाजी जाधव (वय २८) असे त्याचे नाव आहे.

किरण जाधव याने घरामागील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी हा प्रकार उघड झाला. किरण जाधव यांच्यावर खेड, चाकण, खडकी येथे खून, गंभीर दुखापत, विनयभंग असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

चाकण येथील वाईन शॉप मालक सोमाणी हे मंगळवारी रात्री ११ वाजता दुकान बंद करुन घरी जात  होते.  त्यावेळी जाधव व त्याच्या साथीदाराने त्यांना अडवून पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली होती. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली होती. जाधव मात्र फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यानंतर शनिवारी त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like