धुळे : ‘अवधान’ औद्योगिक वसातहीत (MIDC) वीज चोरीचा प्रकार उघडकीस

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – अवधान औद्यौगिक वसाहतीतील सिंमेट ब्लॉक तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये १६ लाखांची वीजेची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल. याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी साजीद तडवी यांनी फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, अवधान औद्योगिक वसाहतीत छोटे मोठे लघु उद्योग सुरु आहे. यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा करण्यात येतो. परंतू काही महिन्यापासून एका कंपनीतील वीज वापर जास्त परंतू युनिट कमी येत असल्याचे निदर्शनास आले. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने वसाहतीतील चेतन सिंमेट ब्लॉक प्रॉडक्स मध्ये जाऊन तपासणी केली असता मुळ मिटरचे बाजूला असलेल्या मीटर रिडींग मध्ये हि तफावत आढळून आली.

हा प्रकार मागील २ वर्षापासून सुरु होता. वीज मीटरमध्ये छेडछाड करुन १५ लाख ३४ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कारखान्याचे मालक अशोक नारायण पाटील आणि वीज वापरणारे नारायण तुळशीराम गोयल (रा.अवधान ) यांचे विरुध्द वीज वितरण कंपनीचे कर्मचारी साजिद फिरोज तडवी यांनी तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात दिली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पायमोडे करीत आहेत.

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’