शेतकर्‍याच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून मृतदेह फेकला विहिरीत

औंढा नागनाथ : पोलीसनामा ऑनलाइन –  हिंगोलीमधील (Hingoli) औंढा नागनाथ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पद्मावती शिवारात एका शेतकऱ्यावर कुर्‍हाडीने वार करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. रवी वाठ ( Ravi Vaat) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, पोलीस या निर्घृणपणे केलेल्या हत्येचा अधिक तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रवी गुरुवारी रात्री शेतीला पाणी देण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी कुऱ्हाडीने हल्ला ( Attack) केला. त्यांची हत्या (Murder) केल्यानंतर मृतदेह जवळच असलेल्या विहिरीमध्ये फेकून हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर पहाटे शेजारील शेतकरी विहिरीजवळ गेले असता, त्यांना रवी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे ( Vaijnath Mundhe) यांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव होत घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी पहाटे सहा वाजल्यापासून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. जमादार आफसर खान पठाण यांनी पंचनामा केला असून, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता. तसेच लवकरच गुन्हेगारांचा शोध लावण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.