पत्नीला whatsapp वर ‘मूर्ख’ म्हणणं भावी पतिला पडले चांगलेच महागात

दुबई : वृत्तसंस्था – व्हॉट्सअॅप वर गमतीने मेसेज करणे देखील पडू शकते महागात.अबू धाबीमध्ये घडलेला प्रकार ऐकलात तर अचंबित व्हाल एका तरुणाने गमतीने केलेला व्हॉट्सअॅपवरील मेसेज त्याला चांगलाच भोवला आहे. या तरुणाने आपल्या भावी सहचारिणीला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठविला आणि त्याची  थेट तुरुंगात रवानगी झाली आहे.

एका वृत्तपत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने होणाऱ्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठविला. या मेसेजमध्ये पतीने तिला मस्करी करत  ‘हबला’ म्हणजेच मराठातीत याचा अर्थ मूर्ख तर हिंदीमध्ये बेवकूफ असं म्हटल. मात्र, तिला या शब्दाचा अपमान वाटला.तिने या कारणामुळे थेट पोलीस स्टेशन गाठले आणि या होणाऱ्या पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी तरुणाला तब्बल 60 दिवसांचा तुरुंगवास आणि  4 लाख रुपयां पर्यंत दंड देखील ठोठावण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी अशी घटना घडली होती. एका ब्रिटिश नागरिकाने दुबईतील कार डीलरला रागाने इमोजी पाठविली होती. तेव्हा त्या ब्रिटिश नागरिकाला देखील तुरुंगात पाठविले होते. सोशल मिडीयावर कोणत्याही व्यक्तीने अपमानजनक शब्दाचा वापर केल्यास, त्या व्यक्तीवर सायबर क्राईमचा गुन्हा दाखल करण्यात येतो. अशी माहिती कायदेशीर सल्लागार हसन-अल-रियामी यांनी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून दिली आहे.