‘अबू सालेम बनू शकला नसता डॉन जर…’मुंबईचे Ex CP राकेश मारियांनी पुस्तकात रहस्य उलघडलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘किती भयंकर चूक होती, जी माझ्याकडून झाली. खोटे बोलण्यात पटाईत असलेल्या या बाईला सहानुभूती किंवा दया दाखवण्याऐवजी मी सुरूवातीलाच थप्पड लागावली असती तर बॉम्बे अंडरवर्ल्डची कहानी काही तरी वेगळीच झाली असती.’ मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर राकेश मारिया यांचे नुकतेच एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. आपले पुस्तक लेट मी से इट नाऊ मध्ये हे वाक्य मारिया यांनी लिहिले आहे. एका बाईला ओळखण्यात झालेली ही चूक त्यांना नंतर खुप महागात पडली. इतकी महागात की, अनेक वर्ष त्यावर पश्चाताप करावा लागला.

ही कहानी उत्तर प्रदेशच्या आजमगड जिल्ह्यातील एका युवकाशी सुद्धा संबंधित आहे, जो मारिया यांना हुलकावणी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. हा युवक अन्य कुणी नसून पुढे जाऊन अंडरवर्ल्डच्या कुख्यात गुन्हेगारांपैकी एक झाला. त्याचे नाव होते अबू सालेम. मारिया यांनी लिहिले आहे की, त्यांना कसा धक्का बसला होता, जेव्हा बॉलिवुड अभिनेता संजय दत्तचे नाव अवैध शस्त्रास्त्रांप्रकरणी प्रथमच समोर आले.

त्यांनी असेही लिहिले आहे की, हे जाणून घेणे आणखी धक्कादायक होते की शस्त्र संजय दत्त याच्या घरी आणली गेली आणि संजय दत्तने त्यापैकी काही आपल्या जवळही ठेवून घेतली. याप्रकरणाच्या तपासादरम्यान जेबुनिस्सा काझीचे नाव सुद्धा समोर आले. ती बांद्रामध्ये माउंट मेरी चर्चजवळ रहात होती. ही तिच जागा आहे, जेथे शस्त्र संजय दत्त याच्या घरातून आणून ठेवली गेली.

मारिया यांनी लिहिले आहे की, जेबुन्निसाला चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जेबुन्निसाने न थांबता रडण्यास सुरूवात केली. ती तीन मुलींसह तिच्या आयुष्यातील समस्यांबाबत सांगू लागली. याशिवाय शस्त्रांबाबत काहीही माहिती नसल्याचे आणि निष्पाप असल्याचे सांगू लागली. तिने हे नाटक एवढे बेमालूमपणे केले की मारिया यांनाही तिच्यावर विश्वास वाटू लागला आणि त्यांनी तिला जाऊ दिले.

मंजूरने दिली जेबुन्निसाची माहिती
मारिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, आता मंजूर अहमद यांची पाळी होती. त्याचीच कार शस्त्रास्त्र आणण्यासाठी दुसर्‍या फेरीसाठी वापरण्यात आली होती. मंजूरनेच जेबुन्निसाबाबत मारिया यांना माहिती दिली होती. जेबुन्निसाला सोडल्यानंतर मारिया यांनी मंजूर अहमदची दुसर्‍यांदा चौकशी केली. मंजूरने सांगितले की, जेबुन्निसा एवढी निष्पाप नाही आणि तिला खुप काही माहिती आहे. मारिया यांना तेव्हा जाणवले की, जेबुन्निसाने आपले खोटे आश्रू गाळून आपली दिशाभूल केली आहे. यामुळे मारिया यांना राग येणे स्वाभाविक होते, आणि त्यांनी पुन्हा जेबुन्निसाला बोलावले.

मारिया यांनी पुस्तकात लिहिेले आहे की, जेबुन्निसा दुसर्‍यांदा माझ्या समोर आली तेव्हा मी रागाने तिला जोरदार थप्पड मारली असती जर तिने तात्काळ माफीसाठी गयावया करण्यास सुरूवात केली नसती आणि हे कबुल केले नसते की, अबू सालेमने शस्त्र तिच्या घरी ठेवली होती. तिने मला तिचा अंधेरीचा पत्ताही सांगितला.

सालेम दिल्लीहून नेपाळमार्गे पळाला दुबईला
परंतु, तोपर्यंत खुप उशीर झाला होता. जेबुन्निसाने अगोदरच अबू सालेमला फोन करून सांगितले होते की, पोलीस तिच्या घरी आले होते. हे समजताच अबू सालेमने तात्काळ मुंबई सोडली आणि तो दिल्लीला पोहचला. तेथे नेपाळवरून तो दुबईत गेला. सालेमचे तेव्हा निसटणे आणि पुन्हा दुबईत अंडरवर्ल्डच्या संबंधाने त्यास डॉन बनवले. असा डॉन ज्याच्या नावाने बॉलीवुडचे सेलिब्रेटीही थरथर कापू लागले.

त्याने बॉलीवुडमधील लोकांकडून खंडणी घेण्यास सुरूवात केली. मुंबईचे बिल्डर्स आणि काही उद्योगपतींनाही त्याने सोडले नाही. 90 च्या दशकाच्या मध्यापासून 2002 पर्यंत सालेम दहशतीचे दुसरे नाव बनला होता. त्याच्या गुन्ह्यांचे सत्र 2002 मध्ये लेस्बन, पुर्तगालमध्ये अटक होईपर्यंत सुरू होते. मारिया यांनी आपल्या पुस्तकात यासंबंधीचे बारकावे नोंदवले आहेत.