राजीव गांधींच्या हत्येला भाजप जबाबदार ? अहमद पटेल यांचा पलटवार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  राजकीय नेत्यांची एकमेकांवर टीका टिप्पणी सुरु आहे.  मग यात अगदी देवाधिकांपासून ते महाभारतातील पत्रांवरून देखील टीका केल्या जात आहेत. एव्हढेच नाही तर दिवंगत नेत्यांचे मुद्दे देखील राजकरणात आणले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेसकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी राजीव  गांधी यांच्या हत्येला भाजप जबाबदार असल्याचे विधान केले आहे. याबाबतचे ट्विट अहमद पटेल यांनी केले आहे.  त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
https://twitter.com/ahmedpatel/status/1126322620117336064
राजीव गांधींच्या हत्येला कोण जबाबदार ? 
अहमद पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “शहिद  पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणे म्हणजे कमजोरपणाची निशाणी आहे. असे म्हणत अहमद पटेल यांनी राजीव गांधी यांच्या हत्येला जबाबदार कोण ? असा सवाल केला आहे. तसेच त्यांनी पुढे आपल्या ट्विट मध्ये नमूद केले आहे की, ‘त्यावेळी भाजपा समर्थित व्ही पी सिंग यांचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी राजीव गांधी यांच्या जीवाला धोका होता हे माहीत असून देखील त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यास नकार देण्यात आला होता. असे असूनही त्यांना केवळ एका PSO सोबत सोडण्यात आले होते’. अशा आशयाचे ट्विट अहमद पटेल यांनी कले आहे.
त्यांच्या या ट्विट वरून दिवंगत राजीव गांधी यांच्या मृत्यूला भाजपाला जबाबदार धरले जात आहे.
गांधी कुटुंबावर मोदींचा हल्लाबोल … 
बुधवारी रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला.  यावेळीच बोलताना मोदी म्हणले , ” जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता.
राजीव गांधींविषयी काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी 
‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही. १९८० मध्ये राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काळात बोफर्स घोटाळा झाला. त्यानंतर काँग्रेसला सत्तेत येणं देखील कठिण झालं होतं. देशाच्या विकासात व्यक्ती म्हणून गांधी घराणं कोणतंही योगदान देत  नसल्याचही मोदी म्हणाले होते.