खळबळजनक ! गर्भवती गर्लफ्रेंडने ब्रेकअप केलं; बॉयफ्रेंडने चाकूने सपासप वार करत तिला संपवलं

जर्मनी : वृत्त संस्था – गर्भवती तरूणीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं होतं. जे बॉयफ्रेंडला सहन झालं नाही. परिणामी त्यांनी गर्भवती गर्लफ्रेन्डवर ६० वेळा चाकून सपासप वार केले. २३ वर्षीय तरूणावर महिलेला टॉर्चर करणे आणि त्याच्यासोबत हिंसा करण्याचा आरोप आहे. त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. ही धक्कादायक घटना जर्मनी मध्ये घडली आहे.

तुर्कीमध्ये राहणारा २३ वर्षीय आलिम के ने स्वीकारलं की त्याने त्याच्या २२ वर्षीय गर्लफ्रेंड जुवी-एनवर कार पार्किंगमध्ये चाकूने वार केले होते. यानंतर त्यने तिचा मृतदेह तिच्या घराच्या काही अंतरावरच दफन केला होता. जर्मनीच्या हॅम शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. २२ वर्षीय ही तरूणी ४ महिन्यांची गर्भवती होती. आपल्या गर्लफ्रेंडला मारल्यानंतर त्याने तिचा मृतहेद तिच्या घरापासून केवळ १०० मीटर अंतरावरील एका जागेवर दफन केला होता. याप्रकरणी जुवीच्या आईने सांगितले की, आलिम तिला टॉर्चर करत होता. कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता आणि तिला मारहाण करत होता. पण ती तरी त्याच्याकडे जात होती. एकदा तर त्याने रागाच्या भरात जुवीचे केस कापले होते.

आलिम अटक झाल्यावर म्हणाला की, त्याला त्याने जे केलं त्याचा पश्चाताप आहे. त्याला वडील व्हायचं होतं. पण त्याला हे माहीत नाही की त्याने कंट्रोल कसा सोडला. या केसची चौकशी सुरू आहे. आलिमला याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जुवीच्या पालकांनी सांगितले, की आलिमने जुवीला धमकी दिली होती की, जर तिने आलिमला सोडलं तर तो तिला जीवे मारेल. तसेच या घटनेनंतर आलिमची एक्स-गर्लफ्रेंड ही समोर आली आहे. तिने आलिमवर रेपचा आरोप केला.