विद्यापीठ उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अभाविप-युवासेनेत ‘राडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अभाविप-युवासेनेत राडा झाला. यावेळी युवा सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच हा राडा झाला. शिवसेने हा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप अभाविपने केला. दरम्यान, अदित्य ठाकरे यांनी शांत बसण्याचे अवाहन केले तरी देखील दोघांमध्ये राडा सुरु होता. अखेर या सगळ्यानंतर चांगल्या कामात तरी सर्व संघटनांनी एकत्र यावं, असं आवाहन आदित्य ठाकरेंना करावं लागलं. गोंधळ घालणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अभाविपने अधिपासून निषेधाची भूमिका घेतली होती. कार्य़क्रमाला लोकप्रतिनीधी चालतील मात्र राजकीय पदाधिकारी नकोत अशी मागणी अभाविपची होती. दरम्यान, कार्य़क्रमाच्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि अभाविप कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. निदर्शने सुरु असताना देखील उद्घाटनाचा कार्य़क्रम सुरु झाला. अभाविपच्या कार्य़कर्त्यांनी कुलगुरुंचे भाषण सुरु असताना निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

मुळे युवा सेनेचे कार्य़कर्ते अभाविपच्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्याने एकच गोंधळ उडाला.
हा प्रकार घडला, त्यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचं भाषण सुरू होतं. तर आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, असे शिवसेनेचे नेते मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमला भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील आणि आमदार नरेंद्र पवार गैरहजर होते.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या