AC घेताय … थोडं थांबा …. लवकरच ३० % कमी दराने उपलब्ध होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे बाजारभावापेक्षा ३० टक्के कमी दराने ‘एअर कंडिशनर’ (एसी) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एलईडी बल्ब, पंखे आणि एलईडी ट्यूब उपलब्ध करून देणाऱ्या ‘एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ अर्थात ‘ईईएसएल’ने यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ ‘एसीं’च्या तुलनेत ‘ईईएसएल’चे ‘एसी’ ४० टक्के विजेची बचत करतील, असा दावाही कंपनीने केला आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत ‘एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ अर्थात ‘ईईएसएलतर्फे आता बाजारभावापेक्षा ३० टक्के कमी दराने ‘एअर कंडिशनर’ (एसी) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अटी –

मात्र हा एसी खरेदी करताना तुम्हाला मासिक हप्त्यांमध्ये पैशांचा भरणा करण्याचा पर्याय मिळणार नाही, यासाठी ग्राहकांना एकाच वेळी पैशांचा भरणा करावा लागेल. तसेच स्वस्तात ‘एसी’ खरेदी करण्यासाठी संबंधित ग्राहकाच्या नावे विजेची जोडणी असणे आवश्यक आहे.

उद्दिष्ट –

साधारणत: दिवाळीपर्यंत ५० हजार ग्राहकांपर्यंत ‘एसी’ पोहोचविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. पुढील वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत दोन लाख ग्राहकांपर्यंत स्वस्त ‘एसी’ पोहोचविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. जुलैपासून ग्राहकांसाठी विक्री सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.