एसी बसचे भाडे २५ टक्क्यांनी कमी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित बसेचे भाडे कमी करण्यास नुकतीच मंजुरी दिल्याचे वृत्त आले आहे. वातानुकूलित बसचे भाडे जास्त असल्यामुळे या बस तोट्यात चालत होत्या, यामुळे या एसी बसचे भाडे कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तब्बल 25 टक्क्यांनी बसचे भाडे कमी केले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8fc5ba00-c630-11e8-b3a9-6bd35c6f0283′]
महामंडळाने प्रवाशांना सुखकारक सेवा देण्यासाठी  शहरातील विविध मार्गांवर १० वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आले होते. मात्र, एसी बस असल्याने त्याचे तिकीट दर जास्त होते, यामुळे सामान्य नागरिक एसी बसप्रवास करत नसल्याचे दिसून आले. हि बससेवा हिंजवडी ते पुणे एअरपोर्ट, निगडी ते भक्ती शक्ती चौक आणि हडपसर ते भक्ती शक्ती चौक (निगडी) या मार्गांवर प्रवास करत होती.
[amazon_link asins=’B075T1YTR9,B07C2ZW7ZB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f30dc40d-c632-11e8-aead-0fb82fc83740′]
यामुळे हिंजवडी ते पुणे एअरपोर्टसाठी प्रवासासाठी सध्या १८० रुपये भाडे आकारले जात होते. ते कमी करून ११० रुपये केले, तर निगडी ते कात्रज आणि हडपसर ते निगडीसाठी १०० रुपये आकारले जात होते, ते आता ७० रुपये करण्यात आले आहे.
जाहिरात