तलाठ्याला लाचेचे प्रलोभन दाखवणे पडले महागात, बिल्डर आणि ब्रोकर गोत्यात !

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – पडीक असलेल्या शेतीचे काम करून देण्यासाठी तलाठ्याकडे आलेल्या एका बिल्डरासह ब्रोकरने 10 हजार रुपयांच्या लाचेचे प्रलोभन दाखवले. त्याला बळी न पडता तलाठ्यानेच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (acb-action-builders-brokers-arrested-luring-talathi) हवाली केले. अमरावती येथील बियाणी चौकात राहुल पानसेंटर समोर शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तलाठ्याचे कौतुक होत आहे.

एमडीएम बिल्डर ॲड डेव्हलपर्स प्रा. लि. संचालक शंकरलाल महेशकुमार आहुजा (33, रा. रामपुरी कॅम्प) आणि ब्रोकर विजय बाबाराव चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तलाठी संतोषसिंग गिल (वय 51, रा. अमरावती) यांनी तक्रार दिली आहे. ते तिवसा तालुक्यातील व-हा सांझा क्रमांक 21 चा कारभार सांभाळतात. तसेच सालोरा बु. सांझा क्रमांक 3 येथील अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे आहे.

आरोपी आहुजा व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मौजा सालोरा बु. येथील पडीक शेतीच्या सात – बारा मधील गाव नमुना 12 मध्ये 220-21 मध्ये कापूस या पीकाची नोंद करून बेकायदेशीर कृत्य करण्याकरिता 22 ऑक्टोंबर रोजी सांजा कार्यालय व-हा येथे पडताळणी कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष आरोपी आहुजा याने तक्रारदार तलाठी यांना 10 हजार रुपयांच्या लाचेचे प्रलोभन दिले. त्यास आरोपी चव्हाण याने सुध्दा लाचेचे प्रलोभन देऊन आरोपी आहुजाला सहकार्य केले. त्यावर एसीबीने सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.

एसीबीचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक पंजाबराव डोंंगरदिवे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे, पोलीस शिपाई विनोद कुंजाम, वैभव जायले, सुनील जायभाये आदीच्या पथकाने ही कारवाई केली.