Anti Corruption Bureau। अभियंताच्या घरी सापडलं 30 किलो सोन्यासह मोठं घबाड; ACB चं पथक ‘मोजून-मोजून’ थकलं

राजस्थान / जयपूर (Rajasthan / Jaipur) : वृत्तसंस्था – Anti Corruption Bureau। राजस्थान (Rajasthan) येथील Anti Corruption Bureau ने कारवाईचा बडगा उभारला आहे. या कारवाईच्या बडग्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पोरखोल समोर आली आहे. यावरून राजस्थानमधील (Rajasthan) जयपूर, जोधपूर आणि चित्तोढगडमध्ये तीन अधिकाऱ्यांशी संबंधित 14 ठिकाणी या पथकाने धाडी टाकल्या आहे. धक्कादायक बाब म्हणजे जयपूर विकास प्राधिकरणात (JDA) असलेले अभियंता निर्मल गोयल (Engineer Nirmal Goyal) यांच्या निवासस्थानी Anti Corruption Bureau ला (ACB) मोठं घबाड सापडलं आहे.

अधिक माहितीनुसार, JDA येथील अभियंता निर्मल गोयल ((Engineer Nirmal Goyal)) यांच्या घरी ACB च्या अधिकाऱ्यांना त्याच्या उत्पन्नाच्या 1450 टक्के अधिक संपत्ती सापडली आहे. गोयलचं वेतन दीड लाख रुपये आहे. परंतु, जयपूर येथे एका वसाहतीत त्याची 4 आलिशान घरे आहेत. दरम्यान छापा टाकला तेव्हा ACB पथकाच्या अधिकाऱ्यांना अभियंता निर्मल गोयल यांच्या फार्म हाऊसमध्ये तीन लाख 87 हजार रुपये रक्कम, 30 किलो सोनं, 245 युरो, 2 हजार डॉलर, मर्सिडिझसह 5 महागड्या फोरव्हिलर सापडल्या आहेत. खरंतर 3 बँकेत अभियंत्याचे लॉकरही आहे, ते अजून ओपन करायचे आहे.

तसेच, चित्तौढगड येथील जिल्हा परिवहन अधिकारी मनीष शर्माजवळ (District Transport Officer Manish Sharma) तब्बल 2 कोटींच्या गुंतवणुकीची कागदपत्रे आढळून आले आहेत. तसेच त्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्याच्या घरात 1 लाखाची रोकड आणि परदेश प्रवासाची कागदपत्रे सापडली आहे. ACB च्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराजवळून महागड्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या देखील ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान, यांनतर तिसरा अधिकारी म्हणजे जोधपूरमध्ये सुरसागर पोलीस ठाण्यातील पोलीस
निरीक्षक प्रदीप शर्माच्या (Inspector Pradeep Sharma) निवासस्थानी ACB च्या
अधिकाऱ्यांनी धाड टाकली. शर्माच्या भोपाळ, बिकानेरमधील मालमत्तावरदेखील छापेमारी कारवाई
करण्यात आली आहे. तर त्यामधून जवळपास साडे चार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची माहिती उघड
झाली आहे. ही संपत्ती धक्कादायक म्हणजे त्याच्या उत्पन्नाच्या 333 टक्के जास्त आहे. तसेच,
यांच्याकडे जोधपूर, भोपाळमध्ये जमीन असून त्याच्या मालकीची 1 शाळा आणि 3 बसेसही आहेत.

हे देखील वाचा

Assembly Monsoon Session | .. म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचंच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे पत्रानेच उत्तर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anti Corruption Bureau। engineer raid rajasthan jaipur jodhpur and chittorgarh anti corruption bureau search operation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update