ACB Arrest PSI Ganesh Shinde | लाच घेण्यासाठी आला अन् 9.50 लाख रुपयांसह 250 ग्रॅम सोनं गमावून बसला, लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Arrest PSI Ganesh Shinde | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Maharashtra) सापळ्याचा संशय येताच एका पोलीस उपनिरीक्षकाने घटनास्थळावरुन पळ काढला. एसीबीच्या पथकाने त्याचा तब्बल तीन किलोमीटर पाठलाग केला. एसीबीचे पथक आपल्या मागे असल्याचे समजताच या पोलीस अधिकाऱ्याने लाचेची रक्कम रस्त्यातच फेकून दिली. मात्र औरंगाबाद एसीबीच्या पथकाने (Chhatrapati Sambhaji Nagar ACB Trap) पीएसआय गणेश शेषेराव शिंदे PSI Ganesh Sesherao Shinde (वय-35) याला सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले. एसीबीच्या पथकाला त्याच्या गाडीत रोख 9 लाख 41 हजार 590 रुपये व 25 तोळे (250 ग्रॅम) सोने मिळाले. त्यामुळे 75 हजाराच्या लाचेसाठी हा पोलीस अधिकारी साडेनऊ लाखांसह सोनं गमावून बसला. ही कारवाई बुधवारी (दि.14) जालना शहरात केली. (ACB Arrest PSI Ganesh Shinde)

 

याबाबत 51 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली. गणेश शिंदे हे कदीम जालना पोलीस ठाण्यात (Kadeem Jalna Police Station) पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मिळालेला आहे. त्यामुळे गणेश शिंदे यांनी तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) कलम 110 ऐवजी कलम 107 प्रमाणे करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयाची लाचेची मागणी (Demanding a Bribe) केली. तडजोडी अंती 75 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. (ACB Arrest PSI Ganesh Shinde)

 

एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता गणेश शिंदे याने एक लाख रुपये लाचेची मागणी करुन 75 हजार रुपये स्विकाण्याचे मान्य केले. पथकाने बुधवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर (Chhatrapati Sambhaji Nagar Bribe Case) शिंदे याला सापळा पथकाचा संशय आल्याने तो लाचेच्या रकमेसह स्वतःच्या खाजगी वाहनातून पळू गेला. पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून गणेश शिंदे याला पकडले. गणेश शिंदे याने लाचेची रक्कम पाठलागा दरम्यान फेकून देऊन पुरावा नष्ट केला. पथकाने पंचासमक्ष आरोपीच्या गाडीची झडती घेतली असता गाडी मध्ये रोख 9 लाख 41 हजार 590 रुपये व 25 तोळे (250 ग्रॅम) सोने मिळून आले आहे. आरोपी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे याच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात (Jalna Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar Crime News)

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित (DySP Maruti Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर (PI Nandkishore Kshirsagar),
पोलीस अंमलदार नागरगोजे, काळे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- ACB Arrest PSI Ganesh Shinde | acb team caught police officer who took bribe of 75 thousand chhatrapati sambhaji nagar crime bribe acb trap news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics News | अजित पवार भाजपासोबत जाणार?, शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण

Pune Crime News | पार्ट टाईम जॉबचा मोह ठरतोय फसवणुकीचा नवा फंडा; लाईक, सबक्राईबच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

Post Office Schemes 2023 | ‘या’ बचत योजनांमध्ये मिळतेय जबरदस्त व्याज, मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना फायदा