ACB Arrest Ranjeet Mahadev Patil | सावकारी कायद्यान्वये कारवाई न करण्यासाठी 20 लाखाची लाच घेणार्‍या सहाय्यक निबंधक रणजीत पाटीलला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Arrest Ranjeet Mahadev Patil | सावकारी कायद्यान्वये कारवाई न करण्याकरिता 20 लाख रूपयाची लाच घेणार्‍या (Nashik Bribe Case) सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) रणजीत महादेव पाटील (32) याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (ACB Arrest Ranjeet Mahadev Patil). 20 लाखाची लाच घेताना पाटीलला अटक झाल्याने सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Nashik ACB Trap)

रणजीत महादेव पाटील (32, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नेमणूक-सहकारी संस्था निफाड,
अतिरिक्त कार्यभार सिन्नर) आणि प्रदीप अर्जुन वीर नारायण Pradeep Arjun Veer Narayan
(45, वरिष्ठ लिपिक निफाड- Niphad, कार्यालय – सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, निफाड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Nashik Crime News). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या आजोबांवर सावकारी कायद्यान्वये कारवाई न करण्याकरिता रणजीत पाटीलने दि. 29 मार्च रोजी तक्रारदाराकडे 20 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम रणजीत पाटील याने मुंबई नाका येथे सरकारी पंचासमक्ष घेतल्याने त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmishtha Gharge Walawalkar),
अप्पर अधीक्षक एन.एस. न्याहळदे, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे,
पोलिस अंमलदार प्रविण महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :-  ACB Arrest Ranjeet Mahadev Patil | Niphad Assistant Registrar Ranjit Patil arrested by anti-corruption for taking bribe of 20 lakhs for not taking action under moneylenders act

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला 17 लाखांना लुबाडणार्‍या वकिलाला अटक; हनी ट्रॅप करणार्‍या तरुणीवर FIR

Union Minister Amit Shah | ‘शिवसेनेसोबत जुनी मैत्री होती म्हणून…’, अमित शहांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान

Pune Crime News | हनी ट्रॅप करुन मॉडेल कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले